शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
3
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
4
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
5
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
6
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
7
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
8
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
9
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
10
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
11
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
12
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
13
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
14
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
15
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
16
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
17
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
18
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
19
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट

वाढत्या कोरोनाने पर्यटन घटले; शहरातील हॉटेल्समधील ८० टक्के खोल्या रिकाम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2021 14:07 IST

Rising corona reduced tourism लॉकडाऊन झाले तर पर्यटनासाठी ज्या शहरात गेलो तिथेच अडकून बसू, अशी भीती निर्माण झाल्याने पर्यटक येणे टाळत आहेत.

ठळक मुद्देशहरात लहान-मोठे ४०० हॉटेल्स आहेत.त्यात १२ ते १५ हजार खोल्या२० हजार कर्मचाऱ्यांचा प्रश्न

औरंगाबाद : वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे भीती निर्माण झाल्याने पर्यटनाच्या राजधानीत येणाऱ्या पर्यटकांची संख्या घटली आहे. त्याचा परिणाम येथील हॉटेल व्यवसायावर झाला आहे. आजघडीला जवळपास ४०० हॉटेल्समधील ८० टक्के रूम रिकाम्या आहेत.

कोरोना जणू संपला असाच गैरसमज शहरवासीयांनी करून घेतला होता. मात्र, पुन्हा एकदा कोरोनाने कहर दाखविणे सुरू केले आहे. सध्या दररोज शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २०० पार जात आहे. याचा पहिला फटका पर्यटन उद्योगाला बसत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात अशीच परिस्थिती आहे. लॉकडाऊन झाले तर पर्यटनासाठी ज्या शहरात गेलो तिथेच अडकून बसू, अशी भीती निर्माण झाल्याने पर्यटक येणे टाळत आहेत. यात ऐतिहासिक वारसा, धार्मिक पर्यटनासोबत औद्योगिक पर्यटकांची संख्याही कमालीची कमी झाली.

औरंगाबाद जिल्हा हॉटेल रेस्टॉरंट मालक संघटनेने दिलेल्या माहितीनुसार शहरात लहान-मोठे ४०० हॉटेल्स आहेत. त्यात १२ ते १५ हजार खोल्या आहेत. आजघडीला त्यातील ८० टक्के खोल्या रिकाम्या आहेत. ऑक्टोबर महिन्यात हॉटेल व्यवसाय सुरू झाला होता. जानेवारीपर्यंत बुकिंग वाढत होती. मात्र, फेब्रुवारीच्या शेवटच्या दुसऱ्या पंधरवड्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या वाढू लागली. पुन्हा एकदा हॉटेल व्यवसाय ठप्प पडण्याच्या मार्गावर आहे. मागील वर्षी लॉकडाऊनमुळे पर्यटनाला मोठा फटका बसला होता. त्यामुळे राज्यभरातून मिळणारा ५०० कोटींचा शासनाचा महसूल बुडाला होता. हॉटेल व्यावसायिकांचे कंबरडे मोडले होते. आता पुन्हा लॉकडाऊन सुरू झाले तर व्यवसायचे काय होणार, असा यक्ष प्रश्न हॉटेल व्यवसायातील व्यवस्थापनांना पडला आहे.

२० हजार कर्मचाऱ्यांचा प्रश्नशहरात जवळपास ४०० हॉटेल्स आहेत. प्रत्येक हॉटेलमध्ये २५ ते ५० कर्मचारी काम करतात. आता लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली तर जवळपास २० हजार कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न व्यवस्थापनासमोर उभा राहणार आहे. बार, रेस्टॉरंटवाल्यांना तर परवाना शुल्क भरणे कठीण जाईल.- शिवाजी पाटील, अध्यक्ष, औरंगाबाद जिल्हा हॉटेल, रेस्टॉरंट मालक संघटना

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याtourismपर्यटनAurangabadऔरंगाबाद