शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

टवाळखोरांनी केली दंगल, परिणाम बाजारपेठेवर; भीतीने ग्राहकांची खरेदीकडे पाठ

By प्रशांत तेलवाडकर | Updated: April 1, 2023 20:11 IST

सर्वत्र व्यवहार सुरळीत आहे. मात्र, खरेदीसाठी महिलांनी बाहेर पडणे टाळले.

छत्रपती संभाजीनगर : रामनवमीच्या आदल्या दिवशी रात्री किराडपुरा भागात दगडफेक, जाळपोळीची अप्रिय घटना घडली. शुक्रवारी पुन्हा त्याची पुनरावृत्ती जटवाडा रोडवरील ओहर या गावात झाली. याचा मोठा परिणाम थेट बाजारपेठेवर झाला. गुरुवारची रामनवमी त्यात गुरुपुष्यामृत योग आणि रमजान महिन्यातील पहिला शुक्रवार असे असतानाही मागील दोन दिवस बाजारपेठेत शुकशुकाट होता. रस्त्यावर रहदारी होती. पण, दुकानात ग्राहक तुरळक होते.

किराडपुऱ्यातील दंगलीनंतर लगातार दुसऱ्या दिवशी बाजाराकडे ग्राहकांनी पाठ फिरविल्याचे पाहण्यास मिळाले. सर्वत्र व्यवहार सुरळीत आहे. मात्र, खरेदीसाठी महिलांनी बाहेर पडणे टाळले. शहरात कधी काय होईल, याचा नेम नसल्याने सध्या नवीन खरेदी टाळा, असा सल्ला घरातूनच महिलांना देण्यात आला होता. यंदा रामनवमी व गुरुपुष्यामृत असा दुग्धशर्करा योग जुळून आला होता. बाजारपेठेत मोठी उलाढाल अपेक्षित होती. पण, गुरुवारी पहाटे दंगलीची बातमी सर्वत्र पसरली आणि ग्राहकांनी बाजारात येणे टाळले. त्याचा मोठा परिणाम बाजारपेठेवर दिसला. आज रमजान महिन्यातील पहिला शुक्रवार होता. सकाळपासून खरेदीसाठी महिला मोठ्या संख्येने घराबाहेर पडतील, अशी आशा व्यापाऱ्यांना होती. पण, बाजारात नेहमीपेक्षा १० टक्केही उलाढाल झाली नाही. यामुळे लाखो, कोट्यवधीचा माल दुकानात भरून ठेवल्याने व्यापारीवर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

२४ कोटीच्या उलाढालीवर पाणीटवाळखोर दंगल करतात. पण, त्याचा दूरगामी परिणाम बाजारपेठेवर होत असतो. मागील दोन दिवसात याची प्रचिती सर्वांना आली. दोन दिवसात २४ कोटीच्या उलाढालीवर पाणी फेरले. यातही मुहूर्ताच्या हिशोबाने कापड व्यापारी, सोने - चांदीच्या विक्रीवर सर्वाधिक परिणाम झाला.-आदेशपालसिंग छाबडा, अध्यक्ष, मराठवाडा चेंबर्स ऑफ ट्रेड अँड कॉमर्स

फळांच्या विक्रीवर २० टक्के परिणामरमजान महिन्यात फळांची मोठी उलाढाल होते. दंगलीचा परिणाम बाजारपेठेवर झाला. पण, फळांच्या विक्रीवर झाला नाही. कारण, फळांची विक्री तेवढीच आहे. मात्र, गुरुवारी रामनवमीनिमित्त खरबूज, रामफळ, अंगुर यांच्या विक्रीवर २० टक्के परिणाम झाला.अश्फाक मोहमद, फळ विक्रेता.

व्यापाऱ्यांना भोगावा लागतो परिणामसध्या वार्षिक धान्य खरेदीचे दिवस आहेत. मात्र, दंगलीनंतर मागील दोन दिवसात धान्य बाजारातील ग्राहक गायब झाला आहे. दंगलीचा परिणाम व्यापाऱ्यांना भोगावा लागतो. कारण, कोट्यवधीची उलाढाल ठप्प झाली आहे.संजय कांकरिया, अध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघ

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarketबाजार