शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
3
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
4
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
5
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
6
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
7
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
8
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
9
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
10
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
11
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
13
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
14
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
15
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
16
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
17
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
18
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
19
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
20
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले

दारुबंदीला हरताळ

By admin | Updated: November 25, 2015 00:20 IST

लोहारा तालुक्यातील हिप्परगा रवा येथील महिलांनी अनेक महिने संघर्ष करून सन २००७ मध्ये गावात दारूबंदीचा ठराव पारित करून घेतला होता़

लोहारा तालुक्यातील हिप्परगा रवा येथील महिलांनी अनेक महिने संघर्ष करून सन २००७ मध्ये गावात दारूबंदीचा ठराव पारित करून घेतला होता़ मात्र, केवळ अडीच वर्षांच्या कालावधीतच दारूविक्रेत्यांनी महिलांच्या लढ्याला हरताळ फासत पुन्हा तेजीत अवैैध दारूविक्री सुरू केली़ सद्यस्थितीत हिप्परगा रवा परिसरात दारूविक्रीला ऊत आला आहे़ विशेषत: राज्य उत्पादन शुल्क विभागासह पोलिसांनी अवैध दारूविक्री रोखण्याकडे दुर्लक्ष केले आहे़ बालाजी बिराजदार ल्ल लोहारा शहरापासून ७ किलोमीटर अंतरावर हिप्परगा रवा हे गाव वसलेले आहे़ गावची लोकसंख्या अडीच हजारांच्या आसपास आहे़ हे गाव काही वर्षापूर्वी तुळजापूर होते़ लोहारा तालुका निर्मितीनंतर या गावाचा समावेश लोहाऱ्यात झाला़ मात्र, या गावासाठी पुन्हा अनेक वर्षे नळदुर्ग पोलीस ठाणे होते़ परिणामी अवैध धंदे करणाऱ्यांवर पोलिसांचा वचक राहिला नाही़ त्यानंतर हे गाव लोहारा पोलीस ठाण्याशी जोडण्यात आले़ मात्र, लोहारा पोलिसांच्या दुर्लक्षामुळे येथील अवैैध दारूविक्रीसह अवैैध धंदे सुरूच राहिले़ खुलेआम होणारी अवैैध दारूविक्री, दारुमुळे उध्दवस्त होणारे संसार, व्यसनाधीन होत असलेली युवा पिढी याला कंटाळून गावातील रणरागिणींनी दारूबंदीसाठी एकत्रित यल्गार केला़ महिलांच्या पुढाकारामुळे, आंदोलनामुळे सन २००७ मध्ये गावात दारूबंदी झाली़ दारूबंदीसाठी महिलांनी एकत्रित येवून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यत धाव घेतली होती़ महिलांच्या मोठ्या आंदोलनानंतर गावातील दारूची बाटली अडवी झाली़ त्यानंतर आडीच वर्षे गावातील दारूविक्री बंद होती़ पण कालांतराने राज्य उत्पादन शुल्क विभागासह पोलीस प्रशासनाचे अवैैध दारूविक्रेत्यांकडे दुर्लक्ष होत गेले़ किंबहुना दारूविक्रेते आणि संबंधित अधिकाऱ्यांचे लागेबांदे झाल्याने दारूविक्री पुन्हा सुरू झाली़ सध्या गावात दोन-तीन ठिकाणी अवैैधरित्या दारूविक्री केली जात आहे़ पोलीस प्रशासनाला, राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही ही बाब माहिती असताना दारूविक्री होतेच कशी ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़ अवैैध दारूविक्रीमुळे अनेकांचे संसार देशोधडीला जात असून, युवा पिढीही व्यसनाधीन होत आहे़ शिवाय गावातील भांडण-तंट्यांमध्येही मोठी वाढ झाली आहे़ महिलांनी मोठा लढा उभारून गावात केलेली दारूबंदी अवैैध धंदेवाल्यांकडून उठविण्यात आली असून, प्रशासनाचेही संबंधितांना सहकार्य लाभत असल्याचा आरोप हिप्परगा येथील ग्रामस्थांतून केला जात आहे़ तरी राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीस प्रशासनाने गावातील दारूबंदी कायम ठेवण्यासाठी जातीने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे़ हिप्परगा रवा येथे दारूबंदी झालेली असतानाही गावातीलच गटा-तटाचे राजकारणही खुलेआम दारूविक्री होण्यास कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे़ दारूबंदीनंतर काहींनी अवैध दारूविक्री करणाऱ्यांना सहकार्य केल्याने त्यांचे मनोबल वाढले़ त्यातच पोलीस, राज्य उत्पादन शुल्कचेही दुर्लक्ष झाले़ एका गटाने दारूबंदीसाठी पुढाकार घेतला तर दुसरा गट दारूविक्रेत्याला सहकार्य करीत असल्याचे दिसत आहे़ पोलिसांची कारवाई झालीच तर त्यांच्याही हातावर तुरी देवून विक्रेते फरार होतात़ त्यातच यामुळे ‘हप्ता’ही चांगलाच वाढल्याचे म्हटले जात आहे़ एकूणच गावातील गटा-तटाचे राजकारणही अवैध दारूविक्रेत्यांसाठी लाभदायक असल्याचे चित्र आहे़