शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धीच्या मोबदल्यापोटी आत्मदहनासाठी रॉकेलची कॅन आणली...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 00:06 IST

समृद्धी महामार्गात जळगाव फेरण येथील एका कुटुंबाची जमीन गेली. मोबदला मिळण्याची वेळ येताच विभक्त राहणाऱ्या सूनबाईने आपला वाटा मागून आडकाठी आणली. जिल्हा प्रशासनानेही आक्षेप येताच मोबदला देण्याची प्रक्रिया थांबविली. त्यामुळे शेतकरी कुटुंब बुधवारी दुपारी एसडीएम कार्यालयात चक्क रॉकेलची कॅन घेऊन दाखल झाले.

ठळक मुद्देएसडीएम कार्यालयात खळबळ : तहसीलदाराकडून आठ दिवसांमध्ये पैसे देण्याचे आश्वासन

औरंगाबाद : समृद्धी महामार्गात जळगाव फेरण येथील एका कुटुंबाची जमीन गेली. मोबदला मिळण्याची वेळ येताच विभक्त राहणाऱ्या सूनबाईने आपला वाटा मागून आडकाठी आणली. जिल्हा प्रशासनानेही आक्षेप येताच मोबदला देण्याची प्रक्रिया थांबविली. त्यामुळे शेतकरी कुटुंब बुधवारी दुपारी एसडीएम कार्यालयात चक्क रॉकेलची कॅन घेऊन दाखल झाले. त्यामुळे कार्यालयात एकच खळबळ उडाली. आठवडाभरात पैसे खात्यावर जमा होतील, असे आश्वासन तहसीलदारांनी दिल्यावर कुटुंबीय निघून गेले.जळगाव फेरण येथील गट नंबर २२४ मध्ये सुलाबाई भाऊसाहेब शेंडे यांची १.०५ आर जमीन आहे. यापैकी ०.९७ आर जमीन समृद्धी महामार्गासाठी संपादित झाली आहे. त्यांना २ कोटी ३१ लाख रुपये मोबदला मिळणार आहे. १० डिसेंबर २०१८ रोजी त्याची रीतसर रजिस्ट्रीही झाली. मात्र मोबदल्याची रक्कम खात्यावर काही जमा झाली नाही. पंधरा दिवस उलटले तरी अधिकारी पैसे काही देईनात. जागेचा मोबदला येणार असल्याने बँकेच्या कर्जफेडीसाठी तडजोड करून २ लाख ७० हजार रुपये २६ डिसेंबरपर्यंत भरावे लागणार आहेत. ही रक्कम वेळेवर न भरल्यास व्याजासह ७ लाख ३६ हजार १२० रुपये भरण्याची वेळ शेंडे कुटुंबियांवर येणार आहे. आमचे पैसे त्वरित जमा करावे, अशी मागणी करून आत्मदहनाचा इशारा सुलाबाई शेंडे यांनी यापूर्वीच जिल्हा प्रशासनाला दिला होता. दरम्यान, शेंडे कुटुंबियांना मोबदला मिळू नये म्हणून विभक्त राहणारी सून ललिता परमेश्वर शेंडे हिने जिल्हा प्रशासनाकडे आक्षेप दाखल केला. त्यामुळे अधिकाºयांनी मोबदला देण्याची प्रक्रिया थांबविली. बुधवारी दुपारी शेंडे कुटुंबीय रॉकेलची कॅन घेऊन कार्यालयात दाखल झाल्याने अधिकारी व कर्मचाºयांची चांगलीच पंचाईत झाली.पत्नीला वाटा देणारमाझी पत्नी वेगळी राहत असून, आम्ही तिच्या वाट्याचे ३६ लाख रुपये देण्यास तयार आहोत. अधिकाºयांनी ही रक्कम बाजूला करून उर्वरित रक्कम आमच्या खात्यावर जमा करावी, अशी विनंती केली. मात्र अधिकारी तेही करीत नसल्यानेच आत्महत्या करण्याची वेळ आमच्यावर आल्याचे परमेश्वर शेंडे यांनी सांगितले.काय म्हणाले तहसीलदारतहसीलदार सतीश सोनी यांनी सांगितले की, सुलाबाई यांची सून ललिता परमेश्वर शेंडे यांनी आक्षेप अर्ज दाखल केलेला आहे. सध्या सून विभक्त राहते. तिला दीड वर्षाची एक मुलगीही आहे. तिच्या हिश्श्याचा शेअर बाजूला काढून उर्वरित रक्कम देता येईल. त्यासाठी कुटुंबातील सदस्यांनी एकत्रित बसून निर्णय घेतला व सुनेकडून संमतीपत्र आणून जमा केले. मात्र त्यावरील सही माझी नसल्याची तक्रार ललिता यांनी केल्याने मोबदला देण्याची प्रक्रिया थांबविण्यात आली.

टॅग्स :Aurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबादSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग