शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बदल्यांच्या तोंडावर महसूल कर्मचाऱ्यांचे आंदोलन म्यान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 18:30 IST

बदल्यांच्या प्रकरणामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी संघटनांना एकाप्रकारे नमविले आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांनी नाक दाबले पुढच्या महिन्यात होणार आहेत अंतर्गत बदल्या

औरंगाबाद : जिल्हा प्रशासनात काम करणाऱ्या महसूल कर्मचाऱ्यांच्या बदल्या पुढच्या महिन्यात होणार असून, त्या पार्श्वभूमीवर १७ मेपासून सुरू असलेले महसूल कर्मचारी संघटनांचे आंदोलन महिनाभरासाठी थांबविण्यात आल्याची चर्चा आहे. बदल्यांसाठी इच्छुकांनी वशिले लावण्यास सुरुवात केली आहे. संघटनांच्या काही पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून इच्छुकांच्या बदल्यांचे काम हाती घेतले आहे. त्या कामात काम बंद आंदोलनामुळे खोडा येऊ नये म्हणून महिनाभरासाठी आंदोलन स्थगित केल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे बदल्यांची यादी करण्यात प्रशासनातील काही वरिष्ठ अधिकारी सक्रिय असून, त्यांनीच आंदोलनाची दिशा बदलल्याचे कळते. 

बदल्यांच्या प्रकरणामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी संघटनांना एकाप्रकारे नमविले आहे. आंदोलन सुरूच राहिले असते तर बदल्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी मोठ्या उलथा-पालथी केल्या असत्या. त्यामुळे इच्छुकांच्या बदल्या मर्जीच्या ठिकाणाऐवजी दुसरीकडे झाल्या असत्या. शिवाय या प्रकरणात ज्यांनी सगळी ‘जमवा-जमव’ केली आहे, त्यांच्या हाती काहीच लागले नसते. परिणामी, मध्यम मार्ग काढीत आंदोलन महिनाभरासाठी स्थगित करण्यातच सगळ्यांचे एकमत झाले. 

गेल्या वर्षी जून महिन्यात जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी महसूल प्रशासनातील अंतर्गत बदल्या करून अनेकांची मुख्यालयात बसलेली घडी विस्कटून टाकली. त्या प्रकरणात विभागीय आयुक्तांपर्यंत चौकशीच्या मागणीसाठी संघटनांनी आवाज वाढविला; परंतु त्यातून काही फलित झाले नाही. ३६ कर्मचाऱ्यांचे मुख्यालय बदलण्यात आले आहे. ६५ पैकी ३८ मंडळ अधिकाऱ्यांच्या बदल्याही गेल्या वर्षी १ जून रोजी करण्यात आल्या होत्या. महिनाभर बदल्यांवरून प्रशासनात खदखद सुरू होती. काहींनी तर मंत्रालयात जाऊन बदली रद्द करण्यासाठी  दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. 

उगाच वाद नको म्हणूनयावर्षीही जिल्हाधिकाऱ्यांनी बदल्या करताना गेल्या वर्षीसारखाच निर्णय घेतला, तर ज्यांनी इच्छित ठिकाणी बदली करण्यासाठी देऊन-घेऊन वशिला लावला आहे. त्यांचे कामबंद आंदोलनामुळे नुकसान झाले असते. जिल्हाधिकाऱ्यांनी बदल्यांच्या पार्श्वभूमीची बाब हेरली आणि संघटना पदाधिकाऱ्यांशी २७ मे रोजी चर्चा करून कामबंद आंदोलन मागे घेण्यास सांगितल्याचे बोलले जात आहे. बदल्यांच्या तोंडावर उगाच जिल्हाधिकाऱ्यांशी वाद नको म्हणून संघटनांनी सायंकाळी आंदोलन महिनाभरासाठी मागे घेतल्याचे जाहीर केले. 

टॅग्स :Aurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबादTransferबदलीRevenue Departmentमहसूल विभाग