शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

अवैध गॅस रिफिलिंग कारवाईच्या अधिकारावरून महसूल-पोलिसांत वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 23:56 IST

अवैध गॅस रिफिलिंग सेंटरवर गुन्हे शाखा पोलिसांनी धाड मारल्यानंतर या प्रकरणी संयुक्त पंचनामा करून पोलिसांत गुन्हा नोंदविण्यावरून महसूल आणि गुन्हे शाखा अधिका-यांत गुरुवारी तब्बल पाच तास वाद रंगला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : अवैध गॅस रिफिलिंग सेंटरवर गुन्हे शाखा पोलिसांनी धाड मारल्यानंतर या प्रकरणी संयुक्त पंचनामा करून पोलिसांत गुन्हा नोंदविण्यावरून महसूल आणि गुन्हे शाखा अधिका-यांत गुरुवारी तब्बल पाच तास वाद रंगला. हा खळबळजनक प्रकार गुरुवारी हर्सूल पोलीस ठाण्यात झाला. वारंवार विनंती केल्यानंतरही महसूल अधिकाºयांनी तक्रार नोंदविली नाही. शेवटी पोलिसांनी सरकारतर्फे फिर्याद नोंदवून गुन्हा नोंदविला.जटवाडा रोडवरील एका हॉस्पिटलजवळील मोकळ्या जागेवर रिक्षात अवैधरीत्या कमर्शियल गॅस सिलिंडरमधून विद्युत मोटारीच्या मदतीने गॅस भरण्यात येत असल्याची माहिती खबºयाकडून गुन्हे शाखेला मिळाली. पोलीस उपनिरीक्षक योगेश धोंडे यांनी या कारवाईसाठी महसूल विभागाच्या अधिकाºयांना पत्र पाठवून कारवाईसाठी सोबत येण्याची विनंती केली. वारंवार संपर्क साधूनही महसूल अधिकाºयांना येण्यास विलंब होत असल्याचे पाहून उपनिरीक्षक धोंडे यांच्या पथकाने त्या गॅस रिफिलिंग अड्ड्यावर धाड मारली. तेव्हा तेथे चार आरोपी विद्युत मोटारीच्या मदतीने सिलिंडरमधील गॅस दोन रिक्षांच्या गॅस टाकीत भरत असल्याचे त्यांना दिसले. यानंतर पोलिसांनी आरोपी पप्पू मीर हिनायत अली, (रा. शहाबाजार), इरफानबाबा पटेले, (बेरिबाग), अंकुश सुखदेव मोकळे (रा.भक्तीनगर) आणि रिक्षाचालक भास्कर अण्णासाहेब लेंभे यांना पकडले. त्यांच्याकडून दोन आॅटो रिक्षा, इलेक्ट्रिक मोटारपंप, एचपी कंपनीचे सात कमर्शियल गॅस सिलिंडर, रेग्युलेटर, दोन वजन काटे आणि रोख ६ हजार ४२०रुपयांचा ऐवज आढळला. कारवाई पूर्ण होत आली तेव्हा महसूलचे अधिकारी तेथे दाखल झाले. यावेळी पोलिसांच्या विनंतीनंतर त्यांनी संयुक्त पंचनामा केला. या पंचनाम्यानंतर हर्सूल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्याचा पोलिसांनी महसूल अधिकाºयांना आग्रह केला. तेव्हा महसूल अधिकाºयांनी गुन्हा नोंदविण्यास स्पष्ट नकार देत, आमच्या पद्धतीनुसार आम्ही त्या आरोपींविरोधात कारवाई करू, अशी भूमिका घेतली. एवढेच नव्हे तर पंचनाम्याच्या पत्रासोबत महसूल विभागाचे स्वतंत्र पत्र तरी पोलिसांना द्या, अशी विनंती अधिकारी करीत होते. मात्र ते पत्रही देण्यास टाळाटाळ करीत होते. आमच्या विभागात तुम्ही हस्तक्षेप कशाला करता, असा सवाल महसूल अधिकाºयांनी पोलिसांना उपस्थित केला. तेव्हा त्यांना काय सांगावे, हे पोलिसांना सुचेना. महसूल अधिकारी ऐकतच नसल्याने शेवटी पोलीस उपनिरीक्षक धोंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून हर्सूल ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.