हिंगोली : जिल्ह्यातील महसूल विभागामधील तीन प्रमुख अधिकाऱ्यांच्या इतर जिल्ह्यात बदल्या झाल्या असून, जिल्हा पुरवठा अधिकारी अभिमन्यू बोधवड यांचीही जालना येथे बदली झाली आहे.जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांची नांदेडच्या निवासी उपजिल्हाधिकारीपदी बदली झाली असून, त्यांच्याजागी नांदेड येथील सामान्य प्रशासनचे उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कळमनुरीचे उपविभागीय अधिकारी रवींद्र पवार यांची औरंगाबाद जिल्ह्यात पैठण- फुलंब्रीच्या उपविभागीय अधिकारीपदी बदली झाली आहे. त्यांचे कळमनुरीतील पद मात्र रिक्तच आहे. औंढा नागनाथ येथील तहसीलदार स्वरूप कंकाळ यांची बदली झाली असून, त्यांच्या जागी पालम येथील तहसीलदार एस. आर. दस्तूरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.कंकाळ यांना अद्याप नियुक्ती स्थान देण्यात आलेले नाही. जिल्हा पुरवठा अधिकारी अभिमन्यू बोधवड यांची जालना सामान्य प्रशासन उपजिल्हाधिकारीपदी बदली झाली असून, त्यांच्या जागी उदगीरचे उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालयातील विशेष भूसंपादन अधिकारीपदी लातूर येथील रोहयो उपजिल्हाधिकारी बी. एल. गिरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच सहाय्यक पुरवठा अधिकारी चौरे यांची हिमायतनगर येथे तहसीलदारपदी बदली झाली आहे. त्यांची जागाही रिक्तच आहे. दरम्यान, बदली झालेल्या सर्वच अधिकाऱ्यांनी सोमवारी पदभार सोडला. निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी साप्रचे उपजिल्हाधिकारी निलावाड यांच्याकडे पदभार सोपविला. त्यानंतर सायंकाळी निलावाड यांच्याकडून फुलारी यांनी पदभार स्वीकारला. अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांचा पदभार उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर यांच्याकडे देण्यात आला असून, कळमनुरी उपविभागीय अधिकाऱ्यांचा पदभार तहसीलदार कृष्णकांत चिकुर्ते यांच्याकडे देण्यात आला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)३ वर्षे सेवेचा कालावधी पूर्णगतवर्षी जिल्हा पुरवठा अधिकारीपदी नियुक्त करण्यात आलेले अभिमन्यू बोधवड यांची जालना येथे बदली.बोधवड यांच्या जागी यापूर्वी जिल्हा पुरवठा अधिकारी असलेले लतीफ पठाण यांची नियुक्ती. अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांचा पदभार निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर यांच्याकडे. कळमनुरीचे उपविभागीय अधिकारी रवींद्र पवार यांची पैठण- फुलंब्रीच्या उपविभागीय अधिकारीपदी बदली.औंढा नागनाथ येथील तहसीलदार स्वरूप कंकाळ यांच्या जागी पालमचे तहसीलदार मदनूरकर यांची नियुक्ती. विशेष भूसंपादन अधिकारीपदी लातूर येथील गिरी यांची नियुक्ती.
महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या
By admin | Updated: June 10, 2014 00:18 IST