शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

लाच प्रकरणात सेवानिवृत्त उद्योग संचालक जे.के. जाधवसह लेखापाल अटकेत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 13:27 IST

बँक खात्यात कर्जाची रक्कम जमा करीत नसल्याने तक्रारदाराने बँकेचे अध्यक्ष जे.के. जाधव यांची भेट घेतली. जाधव यांनी त्यांच्याकडे १ लाख २५ हजार रुपये लाचेची मागणी केली.

ठळक मुद्दे मंजूर कर्ज खात्यात जमा करण्यासाठी घेतली सव्वालाख रुपयांची लाच 

औरंगाबाद : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने मंजूर केलेले कर्ज तक्रारदाराच्या खात्यात वर्ग करण्यासाठी अकाऊंटंटमार्फत १ लाख २५ हजार रुपये लाच घेताच लोकविकास नागरी सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष, राज्याचे सेवानिवृत्त उद्योग संचालक जगन्नाथ खंडेराव जाधव ऊर्फ जे.के. जाधव  आणि लेखापालास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी रंगेहाथ अटक केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची आणि जे.के. जाधव यांच्या घराची झडती एसीबीकडून सुरू होती. 

आत्माराम संतराम पवार (वय ५२ वर्षे, रा. मयूरपार्क, मारुतीनगर) असे अटकेतील लेखापालाचे नाव आहे. औरंगाबाद परिक्षेत्राचे अधीक्षक अरविंद चावरिया यांनी सांगितले की, तक्रारदार हे वैजापूर तालुक्यातील रहिवासी आहेत. त्यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने ८ लाख रुपये कर्ज मंजूर केले होते. या कर्जप्रकरणाची फाईल लोकविकास नागरी सहकारी बँकेत आली होती. बँकेने कर्ज मंजूर करण्यासाठी कर्जदाराच्या वडिलांची शेतजमीन बँकेकडे तारण दिली. बँक खात्यात कर्जाची रक्कम जमा करीत नसल्याने तक्रारदाराने बँकेचे अध्यक्ष जे.के. जाधव यांची भेट घेतली. जाधव यांनी त्यांच्याकडे १ लाख २५ हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार तरुणाने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली.

गुरुवारी तक्रारदाराने  आरोपी जे.के. जाधवला फोन केला असता सिडको एमआयडीसीतील राजर्षी शाहू इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेन्टचा लेखापाल पवार याच्याकडे लाचेची रक्कम देण्यास सांगितले. एसीबीच्या एका पथकाने इन्स्टिट्यूटबाहेर  सापळा लावला, तर दुसरे पथक जाधवच्या सिडकोतील बंगल्याबाहेर जाऊन थांबले.  लेखापाल पवारने तक्रारदाराकडून लाच घेताच  पोलिसांनी त्याला  रकमेसह रंगेहाथ पकडले. दुसऱ्या पथकाने जे.के. यांना बंगल्यातून ताब्यात घेतले.  

जाधव पिता-पुत्रावर गतवर्षी पोलिसांत गुन्हा जगन्नाथ जाधव हे राज्याचे उद्योग संचालक होते. शासकीय सेवेचा राजीनामा देऊन त्यांनी  काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आता ते भाजपमध्ये आहेत. वाहनचालक कृष्णा चिलघर यास  आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून  जाधव पिता-पुत्रावर जिन्सी पोलीस ठाण्यात गतवर्षी गुन्हा नोंद झाला होता. ही कारवाई अधीक्षक  अरविंद चावरिया, अप्पर अधीक्षक जमादार, उपअधीक्षक सुजय घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप राजपूत, पोना. बाळासाहेब राठोड, पोशि. संतोष जोशी, केवल घुसिंगे, राजेंद्र सिनकर यांनी केली. 

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणAurangabadऔरंगाबादAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग