शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

रिॲक्शनचा परिणाम ! आता महापालिकेचे कोरोना लसीकरण केंद्र खाजगी रुग्णालयांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 15:24 IST

corona vaccination कोरोना लसीकरणासाठी महापालिकेने बन्सीलालनगर, सिडको एन-११, एन-८, सादातनगर, भीमनगर येथील आरोग्य केंद्राची निवड केली होती

ठळक मुद्दे एमजीएम, हेडगेवार, धूत, बजाज, मेडिकव्हर रुग्णालयाची निवड

औरंगाबाद : केंद्र शासनाचे कोविन अ‍ॅप बंद पडल्यामुळे कोरोना लसीकरणाची मोहीम दोन दिवस बंद करण्यात आली होती. पहिल्या दिवशी ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली त्यांना रिॲक्शन झाल्यामुळे महापालिकेने सर्व लसीकरण केंद्रे खासगी रुग्णालयांत स्थलांतरित केली आहेत. मंगळवारपासून लसीकरण मोहीम सुरू केली जाणार आहे.

कोरोना लसीकरणासाठी महापालिकेने बन्सीलालनगर, सिडको एन-११, एन-८, सादातनगर, भीमनगर येथील आरोग्य केंद्राची निवड केली होती; परंतु ही पाचही केंद्रे बदलण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील एमजीएम, हेडगेवार, धूत, बजाज, मेडिकव्हर या पाच खासगी रुग्णालयांत लसीकरणाचे केंद्र स्थलांतरित करण्यात आले आहे. या ठिकाणी मनपाचे पथक राहणार असून, आरोग्य कर्मचाऱ्यांना या ठिकाणी कोरोना लसीकरण केले जाणार आहे. लस दिल्यानंतर रिअ‍ॅक्शन झाली तर तातडीने उपचार करता यावेत या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.

कोविन अ‍ॅपद्वारे संदेशकोरोना लसीकरणासाठी महापालिकेने तयारी केली असली तरी पहिल्याच दिवशी कोविन अ‍ॅप बंद पडल्यामुळे लाभार्थ्यांना संदेश पाठविण्यासाठी आरोग्य विभागाची धावपळ उडाली. रात्री उशिरापर्यंत कंट्रोल रूममधून मोबाइलवर संदेश पाठविण्यात आले. शनिवारी लसीकरण झाल्यानंतर कोविन अ‍ॅप बंद पडल्यामुळे दोन दिवस लसीकरण बंद ठेवण्यात आले. सोमवारी कोविन अ‍ॅप सुरू करण्यासाठी आरोग्य उपसंचालक कार्यालयाने एक पथक नेमले असून, या पथकाने ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना कोविन अ‍ॅपद्वारे संदेश पाठविण्याचे काम सुरू केले आहे. दुपारनंतर शहरातील पाचशे लाभार्थ्यांना संदेश पाठविण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. कोविन अ‍ॅप धीम्या गतीने चालत असल्यामुळे निरोप देण्यास वेळ लागत आहे, असेही डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या