शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये चमकोगिरीला चाप बसणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 19:51 IST

बॅनर लावण्यासाठी प्रशासनाची मंजुरी अनिवार्य करण्याचा ठराव व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह इतर महापुरुषांच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन विद्यापीठातील विद्यार्थी कल्याण विभागच करील. विद्यापीठ परिसरात कोणत्याही प्रकारची चमकोगिरी करणारे बॅनर लावण्यासाठी प्रशासनाची मंजुरी अनिवार्य करण्याचा ठराव व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला.

विद्यापीठात सुरू असलेल्या रस्ते कामात बदल करण्याचा ठराव व्यवस्थापन परिषदेत चर्चेत आला होता. तेव्हा सदस्य डॉ. शंकर अंभोरे यांनी विविध पक्ष, संघटनांकडून बॅनरबाजी करण्यात येत असून, त्या माध्यमातून विद्यापीठाचे विद्रुपीकरण होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. तेव्हा विविध सदस्यांनी आक्रमक भूमिका मांडून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बाहेरील संघटना विद्यापीठाचे बॅनर, सभागृहाचा वापर करून कार्यक्रमाचे आयोजन करतात. संबंधित कार्यक्रम विद्यापीठाचा असल्याचे भासवितात. हे सगळे उद्योग बंद केले पाहिजेत.

जयंत्यांना झेंडे, बॅनर लावले जातात. हे बॅनर, झेंडे महिना महिना तसेच असतात. यातून जातीय, धार्मिक तेढ निर्माण होऊन विद्यापीठातील शैक्षणिक वातावरण गढूळ होते. यामुळे यापुढे जे कोणी झेंडे, बॅनर लावतील, त्यांनीच तीन दिवसांच्या आत ते काढले पाहिजेत. जो काढणार नाही, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जावेत. 

तसेच महापुरुषांच्या जयंत्यांसह इतर कार्यक्रमाचे आयोजन विद्यापीठातील विद्यार्थी कल्याण संचालक विभाग करील. इतर कोणत्याही पक्ष, संघटनेचा त्यात सहभाग नसेल, विद्यापीठातील सभागृहेसुद्धा अशा संघटनांच्या कार्यक्रमांना उपलब्ध करून दिली जाणार नाहीत, अशा आशयाचा ठराव व्यवस्थापन परिषदेत सर्वानुमते घेण्यात आला. 

मानधन वाढीवर शिक्कामोर्तबविद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षेत काम करणाऱ्या प्राध्यापकांच्या मानधन वाढीसाठी परीक्षा मंडळाने समिती नेमली होती. समितीने इतर विद्यापीठांतील परीक्षेत देण्यात येणाऱ्या मानधनाचा तुलनात्मक अभ्यास करून  अहवाल सादर केला होता. हा अहवाल परीक्षा मंडळाने मंजूर केल्यानंतर अंमलबजावणीसाठी व्यवस्थापन परिषदेत डॉ. अंभोरे यांनी ठेवला. त्यास डॉ. राजेश करपे, डॉ. फुलचंद सलामपुरे यांनी अनुमोदन देऊन सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थी