खुलताबाद : खुलताबाद तालुका हा जगप्रसिद्ध वेरूळ लेणी व धार्मिक स्थळांमुळे जगाच्या नकाशावर असून या तालुक्याचा पर्यटन प्राधिकरण व तीर्थक्षेत्र विकासाच्या माध्यमातून विकास करण्यात येईल, असे आश्वासन माजी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी आज खुलताबाद तालुक्यातील गदाना येथे गंगापूर-खुलताबाद विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार कृष्णा पाटील डोणगावकर यांच्या प्रचारार्थ येथे झालेल्या जाहीर सभेत दिले.ते पुढे म्हणाले की, देशातील जनतेला अच्छे दिन आनेवाले हैं म्हणून स्वप्न दाखविले, त्या स्वप्नाची काय अवस्था झाली आहे ते आपणास दिसत आहे. शेतीमालाला भाव नाही, कांदा, डाळिंब उत्पादकांचे हाल सुरू झाले आहेत.अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्याउपकेंद्र उभारणीसाठी प्रयत्न करणारशूलिभंजन येथे अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचे उपकेंद्र व्हावे यासाठी आमचा प्रामाणिक प्रयत्न राहणार असून तालुक्यात पाणी, तसेच उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित करण्यात येईल, त्याचप्रमाणे गतिमान शासन देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.व्यासपीठावर आ. सतीश चव्हाण, जिल्हाध्यक्ष सुधाकर सोनवणे, विलास चव्हाण, तालुकाध्यक्ष राजू वरकड, हरिभाऊ डव्हाण, महिला जिल्हाध्यक्ष सुनीता चव्हाण, माजी सभापती महेश उबाळे, माजी नगराध्यक्ष अॅड. कैसरोद्दीन , विश्वनाथ बारगळ, भीमराव खंडागळे, दीपक खोसरे, दिनेश सावजी, अनिल जाधव, रामनाथ पाटील, तुषार शिसोदे, माणिक शिंदे, गणेश वडकर, शरफोद्दीन रमजानी उपस्थित होते.बंब यांनी खोटी आश्वासने दिलीगंगापूर-खुलताबाद विधानसभा मतदारसंघाचे आ.प्रशांत बंब यांनी गेल्या पाच वर्षांत जनतेला खोटी आश्वासने दिली. प्रत्यक्षात कुठलीही कामे केली नाहीत. गंगापूर-खुलताबाद तालुक्यातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे.‘घृष्णेश्वर’साठी मार्ग काढूतालुक्यातील गदाना येथे उभारण्यात येत असलेला श्री घृष्णेश्वर सहकारी साखर कारखाना सुरू होण्याअगोदरच दिवाळखोरीत निघाला आहे. घृष्णेश्वर कारखाना ज्यांच्या ताब्यात होता त्यांनाच चालू करता आला नाही, असे ते म्हणाले.
विकासाची जिम्मेदारी माझी
By admin | Updated: October 7, 2014 00:45 IST