सोयगाव तहसील कार्यालयातील महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने गुरुवारी लाक्षणिक संप पुकारण्यात आला. विविध मागण्यांसाठीच्या या एकदिवसीय लाक्षणिक संपाला चांगला प्रतिसाद मिळाला. या संपामुळे सोयगाव तहसील कार्यालयाचा कारभार ठप्प झाला होता. मात्र, दुसरीकडे पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या विविध विभागांतील कर्मचारी या संपात सहभागी झाले नव्हते. त्यामुळे पंचायत समितीसह आरोग्य विभाग, बाल विकास प्रकल्प, शिक्षण विभाग आदी विभागांचे कामकाज सुरळीत सुरू होते.
महसूल कर्मचारी संघटनेच्या संपाला प्रतिसाद
By | Updated: November 28, 2020 04:09 IST