शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
2
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
3
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
4
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
5
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
6
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
7
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
8
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
9
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
10
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
11
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
12
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
13
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
14
संपादकीय : नामुष्कीचा बॉम्ब, १९ वर्षांनंतरही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
15
विशेष लेख : कुणी काय खावे, याच्याशी सरकारचा काय संबंध?
16
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
17
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
18
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
19
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
20
आम्हाला तोंड उघडण्यास भाग पाडू नका; ईडी.. तुमचा राजकीय वापर का हाेतोय?

राजेंद्र दर्डा यांच्या पदयात्रेला विद्यानगर, न्यायनगरात प्रतिसाद

By admin | Updated: October 3, 2014 00:38 IST

औरंगाबाद : काँग्रेसचे औरंगाबाद पूर्वचे उमेदवार राजेंद्र दर्डा यांच्या पदयात्रेला विद्यानगर, न्यायनगरात गुरुवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

औरंगाबाद : काँग्रेसचे औरंगाबाद पूर्वचे उमेदवार राजेंद्र दर्डा यांच्या पदयात्रेला विद्यानगर, न्यायनगरात गुरुवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पदयात्रेत महिलांनी लक्षणीय उपस्थितीसह सक्रिय सहभाग घेतला. रांगोळी काढून आणि औक्षण करून राजेंद्र दर्डा यांचे महिलांनी उत्साहात स्वागत केले. राजेंद्र दर्डा यांनी केलेल्या आवाहनाला महिलांनी टाळ्यांच्या कडकडाटाने प्रतिसाद दिला. राणानगर ते विद्यानगर या भागातील प्रत्येक गल्लीमध्ये महिला पदयात्रेची आतुरतेने वाट पाहत होत्या. राजेंद्र दर्डा यांच्या प्रयत्नांमुळेच या भागाचा विकास होऊ शकला. ज्या रस्त्यांवरून पूर्वी चालणे कठीण होते, तेच रस्ते आज चकाचक झाल्याने आमच्या भागाचे रंगरूपच पालटले आहे, अशा प्रतिक्रिया महिलांनी व्यक्त केल्या. ड्रेनेजलाईन, खुले रंगमंच, सामाजिक सभागृहांमुळे या भागाचा चेहरामोहराच बदलला आहे. राजेंद्र दर्डा यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभ्या आहोत, अशी ग्वाही यावेळी महिलांनी दिली. पदयात्रा ढोल-ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीने पुढे जात होती. शेकडो कार्यकर्ते गळ्यात काँग्रेसच्या पताका, हातात तिरंगी झेंडे घेऊन पदयात्रेत सहभागी झाले होते. न्यू विशालनगर, सारंग सोसायटी, संदेशनगरमार्गे रोशन सोसायटी भागात पदयात्रा पोहोचली. माजी आमदार नितीन पाटील हे आपल्या कार्यकर्त्यांसह या पदयात्रेत सहभागी झाल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला. न्यायनगर, हुसेन कॉलनीत राजेंद्र दर्डा यांनी परिसरातील नागरिकांकडून सत्कार स्वीकारले. याठिकाणी मोठ्या प्रमाणात स्थानिक कार्यकर्ते पदयात्रेत सहभागी झाले. पदयात्रा पुंडलिकनगर भागातील चौंडेश्वरी सोसायटी, भूषणनगरमार्गे स्वामी समर्थ कमानीपर्यंत पोहोचल्यानंतर राजेंद्र दर्डा यांनी व्यापाऱ्यांशी भेटीगाठी घेत मतदानाचे आवाहन केले. पुढे जयभवानी, हाऊसिंग सोसायटी, गजानन कॉलनी, एस. टी. कॉलनी, स्वप्ननगरी, छत्रपतीनगर भागात काढण्यात आलेल्या पदयात्रेला स्थानिक रहिवाशांकडून प्रचंड प्रतिसाद मिळला. न्यू गजानन कॉलनीत पदयात्रेचा समारोप करण्यात आला. यावेळी परिसरातील नगरसेवक , काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक व समर्थकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. आंबेडकरनगर, नारेगाव-ब्रिजवाडीत आज पदयात्राराजेंद्र दर्डा यांची पदयात्रा आज वॉर्ड क्र. २० आंबेडकरनगर, २२ नारेगाव- ब्रिजवाडी, २३ मसनतपूर भागात काढण्यात येणार आहे. सकाळी ८.३० वाजता गौतमनगर येथून पदयात्रेला सुरुवात होईल. पदयात्रेत कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.