औरंगाबाद : गेट गोर्इंग संस्थेतर्फे आयोजित हेरिटेज सायक्लोस्पेक्टला चांगला प्रतिसाद लाभला. यात लहान मुलांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. गरवारे क्रीडा संकुलावरील कलाग्राम ते बीबी का मकबरा व परत, अशा २0 कि. मी. राईडला सकाळी ६ वाजता प्रारंभ झाला होता. बोचरी थंडी, धुके अशा आल्हाददायक वातावरणात सहभागी सायकलपटू टीव्ही सेंटर, रंगीन दरवाजा, काला दरवाजा, आमखास मैदान, मनपा, बेगमपुरामार्गे मकबरा येथे पोहोचले. परत सगळे याच मार्गाने कलाग्रामला पोहोचले. सायकलोस्पेक्ट यशस्वी करण्यासाठी गेट गोर्इंगच्या उमा महाजन, नीती सोनी, संतोष तोतला, निना निकाळजे, रेखा महाजन, माधुरी निमजे आदींनी परिश्रम घेतले.
हेरिटेज सायक्लोस्पेक्टला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 00:30 IST