शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘गोपाल’काच्या रिसोर्टवर शिजली ‘वंचितांची’ खिचडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 23:45 IST

युद्ध आणि प्रेमात सर्व काही क्षम्य असते

ठळक मुद्देमैदानात सध्या तरी ३० उमेदवार आहेत.निवडणुकीत मदत करण्यासाठी झाली बैठक

औरंगाबाद : युद्ध आणि प्रेमात सर्व काही क्षम्य असते, असे बोलले जाते, ते उगाच नाही. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातदेखील याप्रमाणेच राजकीय घडामोडी होऊ लागल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या मैदानात सध्या तरी ३० उमेदवार आहेत. यातील काही उमेदवार ८ एप्रिलपर्यंत माघार घेण्याची राजकीय चर्चा आहे.

प्रमुख पक्षांसह अपक्ष उमेदवारांमध्ये लढत होण्याची चिन्हे असली तरी एका उमेदवाराने लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरावे. यासाठी पेशाने वकील असलेल्या ‘गोपाल’काच्या शहरालगतच्या रिसॉर्टवर ‘व्होट बँंक’ तोडाफोडीच्या उद्देशाने धर्तीवर एका उमेदवाराला मदत करण्यासाठी बैठक झाल्याची चर्चा आहे.

विधानसभा सदस्य तथा लोकप्रतिनिधी असलेल्या उमेदवाराचा ‘गोपाल’क खूप चांगला मित्र आहे. त्यामुळे ‘गोपाल’काने मध्यस्थी करून सगळी भट्टी जमविली. मागील महिन्यात तो लोकप्रतिनिधी लोकसभा निवडणूक लढणार नाही, असे त्याने जाहीरपणे माध्यमांना सांगितले होते; परंतु ‘गोपाल’काने मध्यस्थी करून वारंवार बैठक घेऊन युतीसाठी आपल्या मित्राला लोकसभा निवडणुकीत उभे राहण्याची विनंती केली. अर्थात, हे सगळे काही फुकट ठरले नसेल.

२० वर्षांपासून सत्तेत असणाऱ्याच्या गोटातदेखील सदरील उमेदवार आपणच उभा केलेला आहे, अशी चर्चा आहे. या मोबदल्यात ‘गोपाल’काच्या नजीकच्या एका जणाला जिल्हा उपाध्यक्षपदाची बक्षिसी मिळाली आहे. मुळात ज्याला बक्षिसी मिळाली आहे, त्या व्यक्तीने बेगमपुऱ्यातील मनपा पोटनिवडणुकीत पक्षविरोधी काम केले होते, अशी तक्रार त्या पक्षाच्या नेत्यांकडे एका बैठकीत करण्यात आली होती. मात्र, त्या नेत्यालादेखील या प्रकरणात कुणीही विचारात घेतले नाही. सगळ्या विरोधाला बाजूला ठेवण्यात आले.

हा सगळा खटाटोप कशासाठीलोकसभा मतदारसंघातील एका विशिष्ट समाजाच्या मतांचे विभाजन करण्यासाठी या ‘गोपाल’क वकिलाने प्रयत्नांची पराकाष्ठा करून राजकीय खिचडी शिजविली. त्यामध्ये त्याला यश आले. एका आघाडीच्या नावाने सदरील उमेदवाराने अर्ज दाखल केला आहे. शहरातील सामाजिक वातावरणाचा लाभ २० वर्षांपासून ज्यांना मिळतो आहे, त्यांनाच यावेळी तसाच लाभ मिळावा, यासाठी हा सगळा खटाटोप करण्यात आल्याचे दिसते आहे. ज्या पक्षाची मदार धर्मनिरपेक्ष मतांवर आहे, तीच मते जर मॅनेज उमेदवाराने खाल्ली, तर इच्छित उमेदवाराचा स्वार्थ पूर्ण होईल, त्या अर्थाने त्या ‘गोपाल’काने मध्यस्थी केल्याची चर्चा सुरू आहे. या प्रकरणाची एक आॅडिओ क्लिपदेखील काही कार्यकर्त्यांकडे असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019