शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
3
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
4
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
5
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
6
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
7
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
8
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
9
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
10
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
11
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
12
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
13
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
14
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
15
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
16
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
17
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
18
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
19
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
20
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...

‘लोकमत अ‍ॅस्पायर’च्या माध्यमातून पालक-विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन

By admin | Updated: June 6, 2016 00:24 IST

लातूर : ‘लोकमत’च्या वतीने शहरातील अंबाजोगाई रोडवरील मुक्ताई मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर २०१६’ या शैक्षणिक उपक्रमाला

लातूर : ‘लोकमत’च्या वतीने शहरातील अंबाजोगाई रोडवरील मुक्ताई मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर २०१६’ या शैक्षणिक उपक्रमाला शहरासह जिल्हाभरातील पालक-विद्यार्थ्यांनी तिसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणावर भेट दिली. लोकमत अ‍ॅस्पायर फेअरच्या माध्यमातून पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक आणि प्रवेशासंदर्भात असलेल्या समस्या, संभ्रम यासह अनेक प्रश्नांची उकल यानिमित्ताने झाली आहे. ‘लोकमत’ने ३ ते ५ जून या कालावधीत महाराष्ट्रातील नामांकित महाविद्यालय, इन्स्टिट्यूट आणि विद्यापीठांच्या शैक्षणिक सुविधा, संधी याबाबत एकाच छताखाली विद्यार्थी आणि पालकांना माहितीचे दालन उपलब्ध करून दिले. रविवारी या उपक्रमाचा शेवटचा दिवस होता. गेली दोन दिवसांपासून या उपक्रमाला नामवंत व्यक्ती, शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी, विद्यार्थी, पालकांनी मोठ्या प्रमाणावर भेट दिली. रविवारी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘लोकमत’ व संगम हायटेक नर्सरी यांच्या संयुक्त विद्यमाने सखी मंच सदस्य आणि महिलांना मोफत रोपांचे संगम नर्सरीचे संगमेश्वर बोमणे, लातूर टेक्सटाईलचे गजानन सावरगावे, संतोष धानोरकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. सकाळी डॉ. दत्ता आंबेकर, वैशाली देशमुख-दुंडिले यांचे मार्गदर्शन झाले. ‘बारावीनंतर स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी?’ या विषयावर कर्मवीर स्पर्धा परीक्षा केंद्र लातूरचे संचालक प्रा. शरद पवार यांनी उपस्थित विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी, अभ्यासाचे नियोजन आणि त्याच्या पद्धती कशा ठरवाव्यात, याविषयी प्रा. पवार यांनी मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)सायंकाळी सिंहगड इन्स्टिट्यूट सोलापूरचे प्रा.डॉ. शंकर नवले यांनी ‘करिअर इन इंजिनिअरिंग’ या विषयावर उपस्थित पालक व विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी इंजिनिअरिंग शाखेचा आॅनलाईन प्रवेश अर्ज कसा भरावा, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. प्रवेश अर्जाच्या अनुषंगाने उद्भवणाऱ्या समस्या यावर त्यांनी विद्यार्थी व पालकांना माहिती दिली. इंजिनिअरिंगमध्ये असलेल्या संधी आणि आव्हानाविषयी प्रा.डॉ. नवले यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांची आवड आणि निवड याचा प्रामुख्याने पालकांनी विचार करावा, असा सल्लाही पालकांना त्यांनी दिला.जगूया आई-वडिलांची स्वप्ने... या विषयावर प्रा. शिवराज मोटेगावकर यांनी सकाळी उपस्थित विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले. वैद्यकीय आणि इंजिनिअरिंगच्या शाखेकडे विद्यार्थ्यांचा असणारा कल, पालकांची भूमिका याबाबत मोटेगावकर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.