शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
4
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
5
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
6
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
7
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
8
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
9
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
10
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
11
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
12
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
13
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
14
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
15
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
16
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
17
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
18
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
19
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
20
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव

विद्यापीठात राजीनामा सत्र कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 01:37 IST

: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनात राजीनामा सत्र कायम आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनात राजीनामा सत्र कायम आहे. परीक्षा संचालकपदासाठी कुलगुरूंनी विद्यापीठातील बहुतांश प्राध्यापकांना विचारणा केली. मात्र, कोणीही पदभार स्वीकारला नाही. शेवटी डॉ. दिगंबर नेटके यांनाच दम देऊन पुन्हा पदभार स्वीकारण्यास भाग पाडले. या सर्व गोंधळामुळे राजीनामा सत्र कायम असून, विद्यापीठ प्रशासनाची दुरवस्था झाली आहे.विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा डॉ. बी.ए. चोपडे यांनी ४ जून २०१४ रोजी पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारताच त्यांनी तत्कालीन बीसीयूडी संचालक डॉ. एस.पी. झांबरे, वित्त व लेखाधिकारी डॉ. एस.टी. सांगळे आणि परीक्षा नियंत्रक डॉ. अशोक चव्हाण यांचा राजीनामा घेतला. यानंतर पदावर नेमलेल्या व्यक्तींमधील पहिला राजीनामा परीक्षा नियंत्रक व कुलसचिव असलेले कॅप्टन डॉ. सुरेश गायकवाड यांचा घेतला. हा राजीनामा विविध संघटनांच्या दबावामुळे घेण्यात आला. तेव्हापासून आजपर्यंत राजीनाम्याचे सत्र कायम आहे. आता अशी वेळ आली आहे, की कोणत्याही पदाचा पदभार स्वीकारण्यास प्राध्यापक, अधिकारी तयार होत नाहीत. हे प्रशासनातील भयानक वास्तव आहे. युवा प्राध्यापकांना संधी देण्यात येत नाही. ज्यांना दिली जाते त्यांच्या पाठीशी उभे राहत नाहीत. त्यामुळे कोणीही जीव ओतून काम करण्यास तयार होत नाही, हे वास्तव आहे.कुलगुरूंच्या साडेतीन वर्षांच्या अल्पशा कार्यकाळात तब्बल १४ कुलसचिव, ८ परीक्षा संचालक, ५ वित्त व लेखाधिकारी, ४ बीसीयूडी व विशेष कार्य अधिकारी, अशा संवैधानिक पदांवर व्यक्तींनी काम केले आहे, तर उर्वरित लहान-मोठ्या पदांचा अनेकांनी राजीनामा दिला असल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत आढळून आले.सहा महिन्यांत यांनी दिले राजीनामेडॉ. सतीश पाटील (विशेष कार्य अधिकारी), डॉ. दिगंबर नेटके (परीक्षा संचालक), डॉ. राजेश रगडे (परीक्षा संचालक), डॉ. सतीश दांडगे (परीक्षा संचालक), डॉ. प्रदीप दुबे (क्रीडा संचालक), डॉ. अशोक मोहेकर (संचालक, विद्यापीठ उपकेंद्र), डॉ. सचिन देशमुख (नॅक समन्वय आणि युनिक संचालक), डॉ. साधना पांडे (फॉरेन स्टुडंट सेल), डॉ. मदन सूर्यवंशी (वसतिगृह क्र. २ चे अधीक्षक), डॉ. विकास कुमार (वसतिगृह क्र. ३ चे अधीक्षक), प्रा. गिरिबाला बोंदले (विद्यार्थिनी वसतिगृह अधीक्षक), संजय शिंदे (वसतिगृह क्र. ५ चे अधीक्षक), डॉ. पुरुषोत्तम देशमुख (संचालक, छत्रपती अध्यासन केंद्र) आदींनी राजीनामा दिला आहे. यातील बहुतांश पदभार संबंधित विभागात कार्यरत असलेल्या अधिका-यांकडे देण्यात आला आहे, तर काही ठिकाणी प्राध्यापक नेमले आहेत.सोडून गेलेले प्राध्यापक व अधिकारीविद्यापीठात कार्यरत असलेले, मात्र संधी मिळताच बाहेर पडलेल्यांमध्ये ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. बी.एस. वाघमारे, डॉ. अरुण खरात, डॉ. भीमराव भोसले आणि डॉ. गणेश यांचा समावेश आहे. आणखी काही जण बाहेरील संधीच्या शोधातआहेत.दोन अधिकारी राजीनाम्याच्या तयारीतविद्यापीठातील प्रशासनात असलेल्या गोंधळामुळे आणखी दोन अधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. या दोन्ही अधिका-यांनी पूर्वीच राजीनामा दिला होता. मात्र, ते कुलगुरूंनी फेटाळले होते. परिस्थितीत सुधारणा झालेली नसल्यामुळे हे अधिकारीसुद्धा कंटाळले आहेत. यात वित्त व लेखाधिकारी डॉ. नंदकुमार राठी आणि विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. मुस्तजीब खान यांचा समावेश आहे.