शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

संचालकांचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 00:16 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. राजेश रगडे यांनी शुक्रवारी सायंकाळी राजीनामा दिला.

राम शिनगारे ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. राजेश रगडे यांनी शुक्रवारी सायंकाळी राजीनामा दिला. कुलगुरूंनी नवीन संचालकांची शोधाशोध सुरू केली असून, पदभार कोण घेणार याविषयी उत्सुकता आहे.विद्यापीठात मागील साडेतीन वर्षांपासून पूर्णवेळ परीक्षा नियंत्रकपद रिक्त आहे. तत्कालीन परीक्षा नियंत्रक डॉ. अशोक चव्हाण यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांच्याकडे प्रभारी पदभार सोपवला होता. विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. बी. ए. चोपडे यांच्या निवडीनंतर कॅप्टन डॉ. सुरेश गायकवाड यांच्याकडे परीक्षा नियंत्रकपदाची धुरा सोपविण्यात आली. त्यांनी अल्पावधीतच अनेक बदल केले; मात्र त्यांच्यावर काही संघटनांनी आक्षेप घेताच त्यांच्या जागी डॉ. वाल्मीक सरवदे यांना नेमण्यात आले. डॉ. सरवदे यांनी काही दिवस कारभार सांभाळल्यानंतर राज्यपालांच्या भेटीवरून त्यांचा कुलगुरूंसोबत विसंवाद झाला. यातच त्यांनी राजीनामा दिला. यानंतर कुलगुरूंनी डॉ. प्रल्हाद लुलेकर यांची नेमणूक केली; मात्र डॉ. लुलेकर सेवानिवृत्त झाल्यामुळे परीक्षा विभागाचा दीर्घकालीन अनुभव असलेले उपकुलसचिव डॉ. दिगंबर नेटके यांना प्रभारी पदभार देण्यात आला. याच काळात विद्यापीठ कायदा बदलून नवीन कायदा लागू करण्यात आला. या कायद्यानुसार परीक्षा नियंत्रकाऐवजी परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक असे नामकरण झाले; मात्र साई इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी महाविद्यालयाने परीक्षेत केलेल्या गोंधळामुळे कुलगुरूंनी डॉ. नेटके यांचा पदभार २० मे रोजी काढला. त्यांच्या जागी पर्यटन विभागाचे प्रमुख डॉ. राजेश रगडे यांची नियुक्ती केली; मात्र त्यांनी पदभार घेतानाच सर्व अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर होईपर्यंत पदावर राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. यामुळे त्यांनी सर्व निकाल लागताच शुक्रवारी (दि. १) पदाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा कुलगुरूंनी मंजूर करून नवीन संचालकांची शोधाशोध सुरू केली आहे.कॅरिआॅनमुळे त्रस्तडॉ.राजेश रगडे यांनी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल वर्धापनदिनी त्यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले; मात्र त्यानंतर आठ दिवसांतच त्यांनी राजीनामा दिला. यामागे कुलगुरूंनी अभियांत्रिकीसाठी कॅरिआॅन आणि एटीकेटीची मर्यादा वाढविण्याचा निर्णय घेतला. मात्र या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी कायद्यात बदल करावा लागतो. तो बदल न करताच अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. यात विनाकारण अडकण्यापेक्षा पदावरून दूर होणे योग्य असल्यामुळे डॉ. रगडे यांनी राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.