शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

संपावरील निवासी डॉक्टरांनी घाटी रुग्णालयातून काढली रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 2:59 PM

आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी घाटीतून रॅली काढली व आपल्या मागण्यांच्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगितले. 

औरंगाबाद : घाटी रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांकडून एका निवासी डॉक्टरला धक्काबुक्की केल्याची घटना बुधवारी (दि.२५) रात्री घडली. या सगळ्या प्रकारानंतर मध्यरात्रीनंतर निवासी डॉक्टरांनी मास बंक आंदोलन पुकारले. आज या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी घाटीतून रॅली काढली व आपल्या मागण्या पूर्ततेच्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगितले. 

आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी घाटीतील निवासी डॉक्टर बुधवारी मध्यरात्रीपासून संपावर आहेत. आंदोलनामुळे गुरुवारी दिवसभर व आज सकाळी तब्बल ३१२ निवासी डॉक्टर गैरहजर राहिली. यामुळे गोरगरीब रुग्णांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

काय आहे प्रकरण मानेला जखम झाल्याने हर्षनगर येथील रहिवासी मधुकर चांदणे (५५) यांना बुधवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास नातेवाईकांनी घाटीतील अपघात विभागात दाखल केले. यावेळी १५ ते २० नातेवाईकांनी रुग्णाभोवती गर्दी केली. गर्दी आणि उपचाराच्या कारणावरून नातेवाईक आणि निवासी डॉक्टरांमध्ये शाब्दिक वाद झाला. यावेळी गर्दी न करता मोजक्याच नातेवाईकांनी थांबण्याची सूचना करण्यात आली. यामुळे संतप्त झालेल्या एका नातेवाईकाने डॉ. हर्षद चव्हाण यांना धक्काबुक्की केली. यानंतर अन्य एका नातेवाईकाने हुज्जत घालून थेट डॉ. चव्हाण यांची कॉलर पकडली. या घटनेची माहिती मिळाल्याने सहयोगी प्रा. डॉ. सुरेश हरबडे हे अपघात विभागात पोहोचले. यावेळी एक नातेवाईक त्यांच्यावरही धावून गेला. कारण नसताना मारहाण व धक्काबुक्की केल्याचा आरोप करून निवासी डॉक्टरांनी मध्यरात्रीपासून मास बंक करीत काम बंद केले. यावेळी डॉक्टरांनी जोरदार घोषणा दिल्या. या प्रकाराची माहिती मिळताच अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे आणि वरिष्ठ डॉक्टरांनी घाटीत धाव घेऊन निवासी डॉक्टरांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. 

यासोबतच गुरुवारी अधिष्ठातांच्या कक्षात उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, शासकीय कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड, पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, सहायक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर यांच्या उपस्थितीत  निवासी डॉक्टरांची बैठक झाली मात्र यावर तोडगा निघाला नाही. यामुळेच निवासी डॉक्टरांनी आंदोलन तीव्र करत आज सकाळी रुग्णालयातून रॅली काढली.

टॅग्स :govermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीdoctorडॉक्टरHealthआरोग्य