बीड : रजा न देताच बीडचे उपविभागीय अधिकारी संजय गायकवाड हे मागील १५ दिवसांपासून सुटीवर गेले आहेत़ यामुळे जिल्ह्यातील दोन हजार विद्यार्थ्यांचे विविध प्रमाणपत्र एसडीओंच्या स्वाक्षरीमुळे तसेच सेतू कार्यालयात पडून आहेत़ विद्यार्थी मात्र रोज सेतू कार्यालयात हेलपाटे मारत आहेत़ वेळेवर जातीचे प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना सैनिकी भरतीला देखील जाता आले नाही़ याचा सर्वाधिक फटका मराठा, मुस्लिम जातीतील विद्यार्थ्यांना बसला़ आरक्षण तर मिळाले परंतु प्रमाणपत्रांविना त्यांची निराशा झाली आहे़विद्यार्थ्यांना विविध विभागातील पदांकरिता जातीचे प्रमाणपत्र, नॉनक्रिमीलेअर तसेच विविध प्रमाणपत्रांची आवश्यकता असते़ यामुळे विद्यार्थ्यांनी वेळेवर आपली कागदपत्रे दाखल केली़ मात्र अनेक विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वेळेवर न मिळाल्याने मनस्ताप सहन करावा लागला. विधानसभा निवडणूक संपते ना संपते तोच बीडचे उपविभागीय अधिकारी संजय गायकवाड यांनी आपल्या पदाचा पदभार इतरांकडे न देताच गायब झाल्याने विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली असल्याचे पहावयास मिळाले.दररोज जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थी जिल्हा कचेरीत विविध प्रमाणपत्रांसाठी चकरा मारत आहेत. आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांला उप विभागीय अधिकारी (एसडीओ) साहेब आलेले नाहीत, असे उत्तर संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. शासनाने मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. यामुळे नव्यानेच जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी जिल्ह्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांची मोठी गर्दी जिल्हा कचेरीत होत आहे. सध्या वेगवेगळ्या विभागात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. यासह बीड येथे सैनिकी भरती सुरू आहे. भरती प्रक्रियेत जायचे तर अगोदर जातीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. नाहीतर शासनाने दिलेल्या आरक्षणाचा काय उपयोग ? यामुळे विद्यार्थी साहेब आज येतील, उद्या येतील म्हणत एसडीओ कार्यालयाचे उंबरे झिजवत आहेत. रजा न देताच सुटीवरउपविभागीय अधिकारी संजय गायकवाड यांनी आपल्याकडील पदभार इतर अधिकाऱ्यांकडे सोपविलेला नसल्याने विद्यार्थ्यांची कोंडी होत आहे. आस्थापना विभागात रजा दिली आहे की, नाही याची चौकशी केले असता एसडीओ संजय गायकवाड यांची रजा आलेली नसल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)जिल्ह्यातील दोन हजार विद्यार्थ्यांचा विविध प्रमाणपत्रांचा खोळंबा झालेला आहे.४ ग्रामीण भागातील विद्यार्थी रोज कार्यालयात हेलपाटे मारतात. ४मात्र १५ दिवसापासून उपविभागीय अधिकारी गैरहजर आहेत़४पुढील दोन दिवसात प्रमाणपत्रांची व्यवस्था केली नाही तर आंदोलन करणार असल्याचे मनविसेचे जिल्हाध्यक्ष शैलेश जाधव यांनी सांगितले.
आरक्षण मिळाले; प्रमाणपत्र कधी ?
By admin | Updated: November 7, 2014 00:43 IST