शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

संशोधक विद्यार्थ्यांकडून बायोमॅट्रीक हजेरीला स्थगितीची मागणी, कुलगुरू मात्र निर्णयावर ठाम

By योगेश पायघन | Updated: January 9, 2023 18:18 IST

विद्यार्थी म्हणतात... संशोधन केंद्रावर आधी सोयीसुविधा द्या, मगच निर्णय लागू करा

औरंगाबाद : संशोधन केंद्रावर आधी सोयी, सुविधा द्या. तोपर्यंत पीएचडी संशोधकांना अनिवार्य केलेल्या बायोमेट्रिक हजेरीच्या निर्णयाला स्थगिती द्या. अशी मागणी संशोधक विद्यार्थ्यांनी सोमवारी कुलगुरूंकडे केली. तर विद्यापीठाच्या विभागात आवश्यक पायाभूत सोयीसुविधा तातडीने उपलब्ध करून देवू. मात्र, निर्णयाला स्थगिती मिळणार नसल्याचे कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांनी स्पष्ठ केल्याने संशोधक विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली.

क्षेत्रभेटीवर आधारीत संशोधकांना क्षेत्रभेटीसाठी किती सुट्या मिळतील. हे अस्पष्ठ असून बायोमॅट्रीकमुळे संशोधकांच्या परीणामकारकरता आणि कार्यक्षमतेवर परीणाम होईल. विभागांच्या पायाभूत सुविधांचे आधी ऑडिट करा. आवश्यक सुविधा द्या. त्यानंतर निर्णयाची अंमलबजावणी करा. विद्यार्थीनी, विविहित महिला, मातांसाठी केंद्रावर येवून संशोधन मानसिक व शाररिक ताण वाढवणारे आहे. द्वीतीयक अभ्यासस्त्रोतावर आधारीत संशोधन असणाऱ्यांना संदर्भ गोळा करणे, कच्चे काम, टायपिंग, शोधपत्र लिहीने सोयीसुविधांअभावी गैरसोयीचे आहे. विद्यापीठाच्या मुख्य ग्रंथालयात संदर्भ विभागात संशोधकांना बसण्यासाठी पुरेशी व्यवस्था नाही. संदर्भ ग्रंथालय अपडेट नाही. संगणक प्रयोगशाळा तसचे प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी क्युबिकल लॅब नाही. इ बुक्स अद्ययावत केलेले नाही. वसतीगृहाची सुविधा पुरेशी नाही. विज्ञान प्रयोगशाळांची अवस्था दयणीय आहे. संशोधनासाठी आवश्यक रसायने नाहीत. या अडचणी आधी सोडवा. त्यानंतर बायोमॅट्रीक हजेरी लागू करा. तो पर्यंत या निर्णयाला स्थगिती द्या अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

कुलगुरूंशी चर्चेचा आग्रह, पोलिसांची मध्यस्थीसंशोधक विद्यार्थी, विद्यार्थीनी, महिला या निर्णयाला विरोधासाठी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीजवळ आल्या. यावेळी पोलिसांचे पाचारण करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी कुलगुरूंसोबत चर्चेचा आग्रह धरला. मात्र, कुलगुरूंनी केवळ प्रतिनीधींना भेटीची परवानगी दिल्याने विद्यार्थ्यांनी रोष व्यक्त केला. पोलिस निरीक्षक राजश्री आडे यांनी विद्यार्थ्यांची समजूत काढून ८-१० पीएचडी नोंदणी असलेल्या विद्यार्थ्यांना भेटी आत सोडले. त्यावेळी विद्यार्थी संघटनेच्या प्रतिनीधींनी नाराजी व्यक्त केली.

विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवाबायोमेट्रिक हजेरी निर्णयाला स्थगिती मिळवण्यासाठी कुलगुरूंची भेट घेत अडचणी सांगितल्या. हा लढा फक्त बायोमेट्रिक हजेरी निर्णय स्थगिती पुरताच मर्यादित नाही. गुणवत्तापूर्ण संशोधनासाठी आवश्यक मूलभूत सुविधा मिळवण्याची मागणी आहे. विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवल्या पाहीजे.-सत्यजित म्हस्के, संशोधक विद्यार्थी

बायोमॅट्रीक हजेरी अनिवार्यचयुजीसीचा निकष, शासन वेळोवेळी माहीती मागवते. त्यामुळे बायोमॅट्रीक हजेरीचा निर्णय मागे घेता येणार नाही. बायोमॅट्रीक हजेरी अनिर्वायच असेल. विभागांत पायाभूत सुविधा उपलब्ध करून देवू. ३०० संगणक, आवश्यक पुस्तके मागवली आहेत. संशोधन केंद्रावर पाणी, बसण्याची व्यवस्थाही युद्धपातळीवर उपलब्ध करून देवू.-डाॅ. प्रमोद येवले, कुलगुरू डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducationशिक्षणAurangabadऔरंगाबाद