औरंगाबाद : डिफेन्स करिअर अकॅडमी व ज्युनियर कॉलेजमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे कॅप्टन सुरेंद्र सुर्व्हे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
डिसीएचे ११ कॅडेट्स एनडीए २०२० ही परीक्षा पास झाले व त्यांच्यातील मयुरेश पाटील आणि तन्मय देशमुख या दोन कॅडेट्सनी एसएसबी मुलाखतीत यश मिळविले. हे यशवंत व त्यांच्या पालकांचा ‘राजमाता जिजाऊ’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. संचालक केदार राहाणे यांनी या कॅडेट्सचे कौतुक केले.
यावेळी अध्यक्ष सोमिनाथ राहाणे, सचिव सचिन राहाणे, प्राचार्य डॉ. आदिनाथ वाकळे, मुख्य प्रशासकीय अधिकारी सुभेदार उद्धव टकले, उत्तमराव कांबळे, युमुनाबाई राहाणे, प्राचार्या उर्मिला राहाणे, प्रशासकीय अधिकारी रामेश्वर राहाणे आदींची उपस्थिती होती.
सूत्रसंचालन प्रा. शब्बीर शेख, गुंडेराव त्रिगुळे, मंदाकिनी नाळे यांनी केले, तर प्राचार्य श्रीलता नायर यांनी आभार मानले.
कॅप्शन
एसएसबी मुलाखतीत यश प्राप्त करणारे कॅडेट्स व त्यांच्या पालकांचा ‘राजमाता जिजाऊ’ पुरस्कार देऊन सन्मान करताना कॅप्टन सुरेंद्र सुर्व्हे, संचालक केदार राहाणे, अध्यक्ष सोमिनाथ राहाणे, सचिव सचिन राहाणे आदी.