शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विनाकारण रुग्णांना रेफर करणाऱ्या डॉक्टरांवर गुन्हा नोंदवा : अब्दुल सत्तार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 18:43 IST

Abdul Sattar News : सरकारी रुग्णालये म्हणजे मंदिरापेक्षा कमी नाहीत

सिल्लोड ( औरंगाबाद ) : सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात सर्व सुविधा उपलब्ध असतांना येथील काही डॉक्टर बाहेरील खाजगी डॉक्टरांशी कमिशन ठरवून  रुग्णांना सिल्लोड व औरंगाबाद येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी रेफर करत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. अशा डॉक्टर व कर्मचाऱ्यांची चौकशीकरून थेट गुन्हा दाखल करण्याचे निर्देश राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आज दिले.

नागरिकांच्या वाढत्या तक्रारीवरून शुक्रवारी अचानक राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी येथील उपजिल्हा रुग्णालयात भेट दिली. रुग्णालयातील अस्वच्छता, डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत अनियमितता,  रुग्णालयातील सर्व विभाग, मेडिकल  स्टॉक , स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्थेची त्यांनी पाहणी केली. यावेळी येथील अस्वच्छता , बंद अवस्थेत असलेले सीसीटीव्ही कॅमेरे, आणि नागरिकांनी केलेल्या तक्रारीवरून त्यांनी अधिकाऱ्यांची कान उघडणी केली. सामान्यांना आरोग्याच्या सुविधा देण्यासाठी सरकार विविध योजना राबवित आहेत. सरकारी रुग्णालये म्हणजे मंदिरापेक्षा कमी नाही मात्र काही मतलबी लोकांमुळे हे रुग्णालयात बदनाम होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

यावेळी उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, नगराध्यक्षा राजश्री निकम, तहसीलदार विक्रम राजपूत, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार मराठे, न.प. तील शिवसेना गटनेते नंदकिशोर सहारे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी सय्यद रफिक, उपमुख्याधिकारी रफिक पठाण, प्रशाकीय अधिकारी अजगर पठाण, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य हाजी मोहंमद हनिफ, दीपाली भवर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित सरदेसाई, वैद्यकीय अधिकारी डॉ. मोरे, डॉ. गायकवाड, डॉ. इंगोले, मोईन पठाण, डॉ.दत्ता भवर हजर होते.

 

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारAurangabadऔरंगाबादhospitalहॉस्पिटल