शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

नावानिशी तक्रार द्या, निलंबित करू...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 00:58 IST

बदल्यांमध्ये अन्याय झाला, ज्येष्ठता याद्या जाहीर केल्या नाहीत, बोगस प्रमाणपत्रे तपासली नाहीत, शिक्षकांनी असे चुकीचे आरोप करूनयेत. खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे ज्या शिक्षकांची बदली झाली आहे, अशा शिक्षकांची नावानिशी तक्रार करा. त्याची शहानिशा करून दोषींना तात्काळ निलंबित केले जाईल, असे शिक्षणाधिकारी एस.पी. जैस्वाल म्हणाले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : बदल्यांमध्ये अन्याय झाला, ज्येष्ठता याद्या जाहीर केल्या नाहीत, बोगस प्रमाणपत्रे तपासली नाहीत, शिक्षकांनी असे चुकीचे आरोप करूनयेत. खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे ज्या शिक्षकांची बदली झाली आहे, अशा शिक्षकांची नावानिशी तक्रार करा. त्याची शहानिशा करून दोषींना तात्काळ निलंबित केले जाईल, असे शिक्षणाधिकारी एस.पी. जैस्वाल म्हणाले.बदलीमुळे अन्याय झालेल्या शिक्षकांची बैठक शनिवारी औरंगाबाद शिक्षक सोसायटी कार्यालयात झाली. या बैठकीत शिक्षकांनी केलेल्या आरोपांचे खंडण करताना शिक्षणाधिकारी जैस्वाल यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, जिल्ह्यातील ८ हजार शिक्षकांनी बदलीसाठी आॅनलाईन अर्ज केले होते. यापैकी साडेतीन हजार शिक्षकांच्या बदल्या झाल्या. बदली झालेल्या शिक्षकांची एवढी मोठी संख्या असून कोणाकोणाची प्रमाणपत्रे तपासायची. बिनबुडाचे आरोप न करता आमच्याकडे थेट नावानिशी तक्रार द्या, त्याची विनाविलंब चौकशी करू व दोषी आढळल्यास, त्या शिक्षकाला तात्काळ निलंबित करू.मराठवाडा शिक्षक कृती समितीचे निमंत्रक दिलीप ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत शेकडो शिक्षकांनी बदली प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचे गा-हाणे मांडले. पती-पत्नी शिक्षक, कनिष्ठ शिक्षक तसेच एकल शिक्षकांवर अन्याय झाले आहेत. संवर्ग- १ व संवर्ग- २ मध्ये अनेक शिक्षकांनी बोगस प्रमाणपत्रांच्या माध्यमातून, तर अनेकांनी चुकीचे अंतर दाखवून बदलीचा लाभ घेतलेला आहे. बदली करताना शिक्षकांची सेवाज्येष्ठता ग्राह्य धरण्यात आलेली नाही, असे आरोप पुराव्यासह शिक्षकांनी केले.

टॅग्स :Aurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदTeacherशिक्षक