शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

साडेसात लाख शेतकऱ्यांना भरपाई

By admin | Updated: January 15, 2015 00:12 IST

व्यंकटेश वैष्णव , बीड दुष्काळाने पिचलेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाकडून खरीप पिकांची नुकसान भरपाई आल्याने बळीराजा सुखावला आहे. यामध्ये साडेसात लाख शेतकऱ्यांना खरीपाचे अनुदान मिळणार आहे

व्यंकटेश वैष्णव , बीडदुष्काळाने पिचलेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाकडून खरीप पिकांची नुकसान भरपाई आल्याने बळीराजा सुखावला आहे. यामध्ये साडेसात लाख शेतकऱ्यांना खरीपाचे अनुदान मिळणार आहे. पुढील आठवड्यात जिल्ह्य बँकेतून शेतकऱ्यांना पैसे वाटप करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.जिल्ह्यातील खरीप पिके पावसा अभावी वाया गेले. यामुळे बळीराजा अर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांना दुष्काळात मदतीचा हात देण्याच्या दुष्टीकोणातून शासनाने खरीप पिकांच्या नुकसान भरपाईपोटी जिल्ह्यातील ७ लाख ८५ हजार ४७२ शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला आहे. याबाबत शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.बीड जिल्ह्यात १४०४ गावे आहेत. या सर्व गावातील खरीपाच्या पिकांची पहाणी करण्यासाठी महिनाभरापूर्वी केंद्राचे एक पथक आले होते. यानुसार जिल्ह्यातील ७ लाख ८५ हजार ४७२ शेतकऱ्यांसाठी १४२ कोटी रूपयांचे अनुदान आले आहे. दोन हेक्टर पर्यंतच्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे. शेतकऱ्यांचे अनुदान जिल्हा बँकेतून वाटप होणार आहे. ११ तालुक्यातील संबंधीत तहसिलदारांच्या मार्फत ज्या-त्या गावातील लाभार्थी शेतकऱ्यांची अनुदान यादी ग्राम पंचायतीच्या सूचना फलकावर डकविण्याची प्रक्रीया सुरू आहे. अनुदान देण्यात येणाऱ्या लाभार्थ्यांच्या यादीवर ज्यांचा आक्षेप असेल त्यांनी तहसिलदार यांच्याकडे चार दिवसात तक्रार करण्यासाठी अवधी दिला आहे़बीड जिल्हयात मागील तीन वर्षापासून शेतकऱ्यांवर आस्मानी संकटाची मालीका सुरू आहे. यामध्ये २०११-१२ मध्ये १८९ कोटी रूपयांचे लाल्याचे अनुदान शेतकऱ्यांना आले होते. याशिवाय २०१४ मध्ये फेबु्रवारी दरम्यान गारपीठ झाली होती. यात शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते. यासाठी १०० कोटी रूपयांचा निधी आला होता.जिल्ह्यात अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. ४यात ६ लाख ५१ हजार २४१ शेतकरी अल्पभूधारक तर १ लाख ३४ हजार २३१ शेतकरी बहू भूधारक आहेत़भरपाई अशी़़़़बागायती९००० प्रति हेक्टरजिरायती४५०० प्रति हेक्टरफळपिक१२००० प्रति हेक्टर