शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

४ 'किमी'साठी २५ रुपयांचे भाडे, अजिंठा लेणीचा प्रवास महागला, पर्यटकात नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2021 19:27 IST

Ajantha - Ellora Caves : जागतिक वारसा स्थळ असलेल्या अजिंठा लेणीतील चित्रशैली व शिल्पकलेच्या जतन, संवर्धन व संरक्षणाच्या नावाखाली पर्यटन विभागाने लेणीत खासगी वाहनांना प्रवेश बंद केला आहे.

ठळक मुद्देपर्यटकांच्या खिशाला बसतेय झळ

सिल्लोड/ सोयगाव : जगप्रसिद्ध अजिंठा लेणी ( Ajantha - Ellora Caves ) परिसरात जाण्यासाठी पर्यटकांना फर्दापूर टी-पॉइंट ते अजिंठा लेणी असा चार किलोमीटर अंतराचा एसटीने प्रवास करावा लागतो. मात्र, एसटी महामंडळाने भाडेवाढ केल्याने पर्यटकांना चार किलोमीटर प्रवास करण्यासाठी तब्बल २५ रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे पर्यटक प्रवाशांची एक प्रकारे महामंडळ लूट करीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अजिंठा लेणीत धावणाऱ्या वातानुकूलित बसच्या भाड्यात मात्र महामंडळाने अद्यापपर्यंत कोणतीही भाडेवाढ केलेली नाही. तर विनावातानुकूलित बसचे प्रवास दर वाढल्याने पर्यटकांसह कामगारांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

जागतिक वारसा स्थळ असलेल्या अजिंठा लेणीतील चित्रशैली व शिल्पकलेच्या जतन, संवर्धन व संरक्षणाच्या नावाखाली पर्यटन विभागाने लेणीत खासगी वाहनांना प्रवेश बंद केला आहे. त्यामुळे अजिंठा लेणी भेटीवर आलेल्या पर्यटकांना व लेणीत काम करणाऱ्या कामगारांना त्यांची खासगी वाहने फर्दापूर टी-पॉइंट येथे उभी करावी लागतात. तेथून महामंडळाच्या बसमधून फर्दापूर टी पॉइंट ते अजिंठा लेणी हा चार किमीचा प्रवास करावा लागतो.

सीएनजीच्या नावाने साधी बसअजिंठा लेणीत गेल्या १५ वर्षांपासून खासगी वाहनांना बंदी करण्यात आली. त्याऐवजी सीएनजी बस चालविल्या जातील अशी घोषणा राज्यकर्त्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्या. मात्र, आजपर्यंत सीएनजी बस आलीच नाही. आधी शटल बस होत्या. आता एशियाड व शिवशाही बस चालविल्या जात आहेत. तीनपट भाडे वसूल केले जात आहे.

एक प्रकारे पर्यटकांची लूटमहामार्गावर आकारल्या जाणाऱ्या बसभाड्यापेक्षा अजिंठा लेणीत धावणाऱ्या बसचे भाडे आधीच दुपटीने वाढविले आहे. त्यात मंगळवारपासून पुन्हा येथील विनावातानुकूलित बसच्या भाड्यात ५ रुपयाने वाढ करण्यात आल्याने अजिंठा लेणी पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांसह कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ही भाडेवाढ मागे घेण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.

डिझेलचे भाव वाढलेडिझेलचे भाव वाढले म्हणून ही भाडेवाढ करण्यात आली आहे. हा निर्णय वरिष्ठ पातळीवरून झाला आहे. विशेष बस चालवल्या, त्या बस दुसरीकडे जात नाहीत. कधी कधी कमी प्रवासात बस सोडावी लागते म्हणून भाडे जास्त आहे.- डी. एन. वाढेकर, प्रभारी वाहतूक नियंत्रक, अजिंठा लेणी

टॅग्स :Ajantha - Elloraअजंठा वेरूळtourismपर्यटनAurangabadऔरंगाबाद