शहरं
Join us  
Trending Stories
1
सूडानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
2
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
3
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
4
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
5
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
6
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
7
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
8
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
9
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
10
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
11
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
12
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
13
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
14
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
15
साताऱ्यात मेफेड्रॉन कारखाना उद्ध्वस्त; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त, सात अटकेत
16
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
17
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
18
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
19
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
20
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
Daily Top 2Weekly Top 5

कुलगुरू प्रमोद येवलेंना हटवा; विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्यांची कुलपतींकडे मागणी

By योगेश पायघन | Updated: August 6, 2022 18:59 IST

बैठकांचे इतिवृत्त न मिळाल्याचे कारण, कर्तव्यात कसूर केल्याचा सदस्यांचा आरोप

औरंगाबाद-डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रमुख प्राधिकरण असलेल्या अधिसभेची बैठक ७ मार्च २०२२ रोजी झाली. त्या बैठकीचा कार्यवृत्तात ३० दिवसात मिळणे अपेक्षित असतांना तो वारंवार मागून सदस्यांना दिला जात नाही. हा सदस्यांचा अवमान असून कुलगुरूंचा कर्तव्यात कसुर आहे. त्यांना पदावरून हटवण्याची मागणी व्यवस्थापन परिषद सदस्य संजय निंबाळकर, डाॅ. फुलचंद सलामपुरे, डाॅ. राजेश करपे, डाॅ. भारत खैरनार, डाॅ. लक्ष्मीकांत शिंदे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली.

कुलपतींकडे केलेल्या मागणीत महाराष्ट्र विद्यापीठ कायदा २०१६ कलम २८ (२) नुसार अधिसभा हे प्रमुख प्राधिकरण आहे. तसेच २०१९ एकरूप परीनियम क्रमांक ४ मधील कमल १५ नुसार ३० दिवसांच्या आत कार्यवृतांत प्रत अधिसभा सदस्यांना पाठवणे बंधनकारक आहे. मात्र, कुलगुरूंनी त्यांचे कर्तव्य कलम १२ (५) नुसार पार पाडले नसून कर्तव्यात कसुर करणे विद्यापीठाची बदनाम करणारा आहे. त्यांनी सदस्यांच्या भावना दुखवून अवमान केला आहे. त्यामुळे त्यांची कुलगुरू पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी सदस्यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, उच्च शिक्षण प्रधान सचिव, संचालकांकडे केली निवेदनाद्वारे केली आहे.

व्यवस्थापन परिषद निर्णयाची माहिती मिळावी...व्यवस्थापन परीषदेची बैठक २७ मे रोजी झाली. त्यात ५० पेक्षा अधिक विषयांवर चर्चा झाली. या बैठकीच्या इतिवृत्ताची मागणी केली. ती माहिती देता येणार नसल्याचे कुलसचिवांनी कळवले आहे. हे हुकूमशाही पद्धतीने वागणे विद्यापीठ कायद्याचे उल्लंघन करणारे आहे. या बैठकीत बहुमताने घेतलेले निर्णय व केलेली कार्यवाही व्यवस्थापन परिषदेला कळवणे गरजेचे आहे. ते कागदपत्र मिळवे. तसेच कुलगुरूंवर दंडात्मक व कायदेशीर कारवाईची मागणी दुसऱ्या निवेदनात करण्यात आली आहे.

हिटलरशाही पद्धतीने कामकाज...अधिसभा, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आहोत. कार्यकाळ ३१ ऑगस्टला संपत असल्याने होय रे बा म्हणणाऱ्या बगलबच्च्यांना घेवून त्यांना कार्यकाळ संपल्यावर कुलगुरूंना बैठक घ्यायची आहे. हिटलरशाहीने हे कामकाज सुरू असून राज्यपालांच्या वक्तव्यांचा निषेधासह विविध ठराव बहुमताने पारित आहे. तो वगळून खोटे ठराव कार्यवृत्तांत त्यांना लिहायचा आहे. असा आरोप निंबाळकर यांनी करत आमदार, खासदार, पुढारी, मंत्र्यांच्या काॅलेजवर कारवाई नाही. निवडक महाविद्यालयांवर होणारी कारवाई सर्वसमावेश व्हावी. असेही ते म्हणाले.

विद्यापीठाचे कायद्यानुसार कामविद्यापीठाचे काम कायद्याच्या तरतुदीनुसार सुरू आहे. अनेक वर्षांपासून सुरू महाविद्यालयालांत प्राचार्य, प्राध्यापक नाहीत. अशाच महाविद्यालयांची तपासणी करत आहोत. त्यात कुठलाही भेदभाव नाही. शुक्रवारी संस्थाचालकांचे शिष्टमंडळ भेटायला येत असल्याचे मला माहित नव्हते. पुर्वनियोजीत असते तर भेटीची वेळ दिली असती.-डाॅ. प्रमोद येवले, कुलगुरू, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबाद