शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

एचएसआरसी नंबरप्लेट देणाऱ्या सेंटरवर लक्ष कुणाचे? बदलणारे कमी, वाहनधारकच बनले कामगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 16:40 IST

जुनी नंबरप्लेट घरी काढा, नंतरच एचएसआरसी प्लेट बसवण्यास जा; वाहनधारकांना मन:स्ताप

छत्रपती संभाजीनगर : ऑनलाइन अपॉइंटमेंटप्रमाणे तुम्ही एचएसआरसी प्लेट बसवण्यास जात असाल तर किमान अर्धा दिवस राखून ठेवलेलाच बरा. शिवाय जुनी नंबर प्लेट तुम्ही घरीच काढा. कारण त्या सेंटरवर या नंबर प्लेट काढण्यासाठी पान्हे, स्क्रू ड्रायवर, पकड आदी साहित्य नसते. अल्प परिश्रमात ती निघाली तर ठीक नाहीतर सेंटरवरून तुम्हाला गॅरेजवर जाऊन जुनी नंबर काढून आणावी लागते. नंतरच एचएसआरसी प्लेट बसवली जाते, यासह अनेक प्रकारे वाहनधारकांची लूट केली जाते आहे. याकडे आरटीओने चक्क दुर्लक्ष केले आहे.

सन २०१९ पूर्वीच्या वाहनांना एचएसआरसी प्लेट बसविणे सरकारने अनिवार्य केल्यानंतर अनेकांनी ऑनलाइन पैसे भरून सेंटर अपॉइंटमेंट घेतली. नियोजित तारखेनुसार वाहनमालक तेथे गेल्यावर त्यांना येणारे अनुभव त्रासदायक आहेत.

प्लास्टिक फ्रेम घ्या, अन्यथा...बीड बायपासवरील सेंटरवर आलेल्या वाहनधारकांना नंबर प्लेट बदलण्यासाठी टोकन नंबर घेताना प्लास्टिक फ्रेम घेण्याचे सांगण्यात येत होते. ती घेण्यास नकार देणाऱ्या लोकांना नवी नंबर प्लेट बसवताना तुटफूट झाल्यास आम्ही जबाबदार नाही, असे धमकावले जात होते. प्रतिप्रश्न करून जो कुणी ही प्लास्टिक फ्रेम घेत नव्हता, त्याचे प्लेट लवकर बदलून दिले जात नव्हते. त्याला चार - ते पाच तास ताटकळत ठेवले जात होते.

मोठी गर्दी, प्लेट बदलणारे कमीअनेक सेंटरवर वाहनमालकांची प्रचंड गर्दी होते आहे. परंतु, तेथे प्लेट बदलणाऱ्या कामगारांची संख्या अल्प आहे. त्यामुळे बरेच तास थांबावे लागते. त्यातही तेथील कामगारांना काही चिरीमिरी दिली की, टोकन नंबर बाजुला ठेवून ते पटकन नंबर प्लेट बसवून देत होते. एखाद्याने नियम दाखवला तर त्याची जुनी नंबर प्लेट निघत नाही, असे सांगून बाहेर गॅरेजवरून काढून आणण्यास सांगितले जात होते. जुनी नंबर प्लेट काढण्यास आमच्याकडे साहित्य नाही, आम्ही केवळ नवी नंबर प्लेट बसवितो, असे सांगून तुम्ही तुमचे लेटर वाचून काढा, असा शहाजोग सल्लाही ते ऐकवत होते.

वाहनधारकच बनले कामगारसेंटरमधील हे वातावरण पाहून वाद घालण्यापेक्षा वाहनधारकच आपल्या वाहनांची जुनी नंबर प्लेट काढत होते. त्यासाठी आपल्या वाहनातील पकड, स्क्रूड्रायवरची शोधाशोध केली जात होती. ज्यांनी नंबर प्लेट काढली त्या वाहनांना नवी नंबर प्लेट लावतानाही वाहनधारकांच्या ‘हाता’कडे हे कामगार पाहात होते. शिवाय येथे कामगारांची संख्या कमी असल्यामुळे वाहनधारकांनाच नंबरप्लेट बदलण्यापासून नवी बसविण्यासाठी सर्व मदत सेंटरच्या कामगारांना करावी लागते. नव्हे तशी मदत न केल्यास ते कामगार तुमच्या वाहनाकडे येतच नाहीत, असेच चित्र या सेंटरमध्ये होते.

जुन्या नंबर प्लेटचे काय?जुन्या काढलेल्या नंबर प्लेट हे सेंटरचालक ठेवून घेतात. त्यातून शेकडो क्विंटलचे लोखंडाचे भंगार या सेंटरवर जमा झाले होते. या भंगाराच्या पैसे कोण घेणार, असा प्रश्नही त्यातून पुढे आला आहे.

वाहनधारकांनी तक्रार करावीहाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसविण्यासंदर्भात वाहनधारकांच्या काही तक्रारी असल्यास आरटीओ कार्यालयास करता येईल. या तक्रारीची शहानिशा करून पुढील कारवाई केली जाईल.- विजय काठोळे, प्रादेशिक परिवहन अधिकारी

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर