उमरगा : बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन एका विवाहित महिलेचे दागिने व रोख दहा हजार रूपये अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना येथील बसस्थानकात २८ मे रोजी घडली. याप्रकरणी मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, लातूर येथे वास्तव्यास असलेल्या सुवर्णा चंद्रशेखर पाटील या उमरगा येथे आल्या होत्या. येथील बसस्थानकावर उमरगा-गुलबर्ग या बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी त्यांच्या पर्समधील नव्वद हजार रूपये किंमतीचे पाच तोळ्याचे सोन्याचे गंठण व रोख दहा हजार रूपये, असा एकूण १ लाख रूपयांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी सुवर्णा पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उमरगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोफौ युनूस शेख करीत आहेत. (वार्ताहर)
दागिन्यासह रोख रक्कम लांबविली
By admin | Updated: June 4, 2014 01:32 IST