शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

धार्मिक स्थळ : मनपाचा कृती कार्यक्रम, शासन निर्णयानुसार कारवाईचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 01:17 IST

महापालिकेचा कृती कार्यक्रम आणि शासन निर्णयानुसार शहरातील धार्मिक स्थळांच्या अतिक्रमणांबाबत कारवाई करण्याचे निर्देश देत न्या. शंतनू केमकर आणि न्या. एन. डब्ल्यू सांबरे यांच्या खंडपीठाने ‘सुमोटो’व्यतिरिक्त या संदर्भातील सर्व याचिका, दिवाणी अर्ज बुधवारी निकाली काढले

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिकेचा कृती कार्यक्रम आणि शासन निर्णयानुसार शहरातील धार्मिक स्थळांच्या अतिक्रमणांबाबत कारवाई करण्याचे निर्देश देत न्या. शंतनू केमकर आणि न्या. एन. डब्ल्यू सांबरे यांच्या खंडपीठाने ‘सुमोटो’व्यतिरिक्त या संदर्भातील सर्व याचिका, दिवाणी अर्ज बुधवारी निकाली काढले.याचिकेवरील पुढील सुनावणी १२ आॅक्टोबरला होणार आहे. त्या दिवशी मनपाच्या कृती कार्यक्रमाचा अहवाल खंडपीठात सादर करावयाचा आहे. खंडपीठाने यापूर्वी दर शुक्रवारी प्रगती अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते.मनपाचे अतिरिक्त शपथपत्रमनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी आज खंडपीठात अतिरिक्त शपथपत्र सादर करून खंडपीठाच्या आदेशानुसार २१ आॅगस्ट २०१७ रोजी मनपा स्तरावरील समितीची बैठक पार पडली. त्यात धार्मिक स्थळांची अतिक्रमणे हटविण्याबाबतच्या पूर्वीच्या कार्यक्रमावर चर्चा करून नव्याने कार्यक्रम तयार करण्यात आला. बैठकीस सर्वच सदस्य उपस्थित होते, असे म्हटले आहे.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १२ आॅगस्ट रोजी वर्तमानपत्रात प्रगटन देऊन धार्मिक स्थळांबाबतचे आक्षेप व हरकती १८ आॅगस्टपर्यंत मागविण्यात आल्या. २०१५ साली ८०३ आक्षेप प्राप्त झाले होते, तर आता ११०५ असे एकूण १९०८ आक्षेप प्राप्त झाले आहेत. या हरकतींवर सुनावणी घेऊन निर्णय घेण्यासाठी वेळ लागणार आहे. म्हणून ५ मे २०११ च्या शासन निर्णयाचा विचार करून समितीने नवीन कृती कार्यक्रम आखला आहे. आज याचिकाकर्त्यांतर्फे न्यायालयाचे मित्र अ‍ॅड. प्रदीप देशमुख, इतर याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. आर. एन. धोर्डे व व्ही.जे. दीक्षित, अ‍ॅड. सिद्धेश्वर ठोंबरे, अ‍ॅड. सुजित जोशी, अ‍ॅड. एस.के. कय्युम नाझीर, अ‍ॅड. श्रीकृष्ण सोळंके, अ‍ॅड. संदीप राजेभोसले, अ‍ॅड. सुशांत दीक्षित व अ‍ॅड. विक्रम धोर्डे यांनी काम पाहिले.