शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
5
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
6
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
8
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
9
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
10
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
11
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
12
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
13
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
14
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
15
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
16
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
17
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
18
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
19
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
20
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईच्या नियमित रेल्वेचा प्रवास ‘वेटिंग’वर, उन्हाळी सुटीत एक साप्ताहिक रेल्वे धावणार, ‘नंदीग्राम’ला वाढविली एक बोगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 20:06 IST

छत्रपती संभाजीनगरमार्गे मुंबई-हैदराबाद विशेष रेल्वे सुरू; नियमित गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्याने रेल्वेचा निर्णय

छत्रपती संभाजीनगर : उन्हाळी सुट्यांमुळे मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परिणामी, वंदे भारत एक्स्प्रेस वगळता अन्य रेल्वेचे आरक्षण ‘वेटिंग'वर गेले आहे. उन्हाळ्यात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबई (सीएसएमटी) ते हैदराबाद साप्ताहिक विशेष रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच नंदीग्राम एक्स्प्रेसमध्ये तात्पुरत्या स्वरूपात एक अतिरिक्त बोगी जोडण्यात येणार आहे.

२३ एप्रिल ते ९ जुलैदरम्यानने मुंबई (सीएसएमटी) ते हैदराबाद विशेष रेल्वे धावेल. मुंबईहून हैदराबादकडे जाणारी विशेष विशेष रेल्वे (०१०११) ही छत्रपती संभाजीनगर स्थानकावर गुरुवारी सकाळी ७:४० वाजता येईल आणि ७:४५ वाजता पुढे रवाना होईल. तर हैदराबादहून मुंबईला जाणारी विशेष रेल्वे (०१०१२) ही दर शुक्रवारी सकाळी १०:१० वाजता येथे येऊन १०:१५ वाजता मुंबईकडे रवाना होईल. ही रेल्वे सायंकाळी ५:३० वाजता ठाणे, रात्री ८ वाजता मुंबईला पोहोचेल.

बोगींची संख्या १८ वरून १९मुंबई सीएसएमटी- बल्लारशाह- मुंबई सीएसएमटी नंदीग्राम एक्स्प्रेसमध्ये तात्पुरत्या स्वरूपात एक अतिरिक्त एसी ३-टियर बोगी जोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला. यामुळे नंदीग्राम एक्स्प्रेसची एकूण बोगींची संख्या आता १८ वरून १९ होणार असून, एसी ३-टियर बोगींची संख्या दोनवरून तीनवर पोहोचली आहे. यामुळे प्रवाशांना वातानुकूलित श्रेणीत अधिक राखीव बर्थ उपलब्ध होणार आहेत. मुंबई सीएसएमटी येथून सुटणाऱ्या रेल्वेसाठी ही सुविधा १५ एप्रिल ते १५ मे २०२६ या कालावधीत उपलब्ध असेल, तर बल्लारशाह येथून सुटणाऱ्या रेल्वेसाठी ही वाढीव बोगी १७ एप्रिल ते १७ मे पर्यंत राहील.

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai Rail Travel 'Waiting,' Weekly Train for Summer, Extra Nandi Gram Bogie

Web Summary : Mumbai-bound trains are full. A weekly Mumbai-Hyderabad special train will run. Nandi Gram Express gets an extra AC coach, increasing capacity for travelers during peak season.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरRailway Passengerरेल्वे प्रवासी