शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

अनर्थ टळल्याने सुटकेचा निश्वास

By admin | Updated: June 2, 2017 00:38 IST

जालना : रेवगाव फाट्यावर बुधवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या भीषण अपघातात डिझेल टँकरच्या धडकेत वीजप्रवाह सुरू असलेला खांब मुख्य रस्त्यावर पडला

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : रेवगाव फाट्यावर बुधवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या भीषण अपघातात डिझेल टँकरच्या धडकेत वीजप्रवाह सुरू असलेला खांब मुख्य रस्त्यावर पडला. विजेच्या तारांमधून स्पॉर्किंग होऊ लागली. याच वेळी रस्त्यावर अन्य वाहने जात होती. मात्र, पोलिसांनी तत्परता दाखवत दोन्ही बाजूची वाहने थांबविल्यामुळे पुढील अनर्थ टळला.कार व डिझेल टँकरचा अपघात घडला तेंव्हा उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी यांची पॅट्रोलिंगची व्हॅन ट्रकपासून काही अंतरावर होती. समोर अपघात घडल्याचे लक्षात बारी यांच्यासह कदीम जालना ठाण्याच्या पॅट्रोलिंग पथकातील पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, उपनिरीक्षक एस. डी. शेजूळ, कर्मचारी सुधीर गायकवाड, धम्मा सुरडकर, वर्मा हे मदतीसाठी धावले. पोलिसांनी सुरुवातीला दोन्ही बाजूने येणारी वाहने थांबवली. अंबड चौफुली व मंठा चौफुलीवरून येणारी शहरातून वळवली. ही वाहने रस्त्यावर पडलेल्या विजेच्या तारावरून गेली असती, तर विजेची स्पॉर्किंग होऊन बाजूला पडलेल्या टँकरमधील डिझेल व पेट्रोल टॉकीचा स्फोट होऊन मोठी दुर्घटना घडली असती. इंडिका कारमधील जखमी चालक दत्ता त्र्यंबक टोळ, सलमान खान पठाण, साजनबी पठाण यांना पोलीसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने तत्काळ बाहेर काढून रुग्णवाहिकेतून जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविल्यामुळे त्यांच्यावर वेळेत उपचार करता आले. दरम्यान, मुख्य रस्त्यावर असलेल्या रेवगाव फाट्यावर अंधार राहत असल्यामुळे दोन्ही बाजूने भरधाव येणारी वाहने अचानक समोरासमोर येऊन या पूर्वीही अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी पथदिवे बसविण्याची गरज आहे.