शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात होणार ३६५ खाटांचे प्रादेशिक मनोरुग्णालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 18:31 IST

मराठवाड्याची अनेक दशकांची मागणी मार्गी

ठळक मुद्दे१० एकर जागा देण्याची प्रक्रिया सुरु रत्नागिरीच्या धर्तीवर उभारणी

औरंगाबाद : मराठवाड्यातील कित्येक दशकांची प्रादेशिक मनोरुग्णालयाची मागणी अखेर मार्गी लागली आहे. जालना येथे ३६५ खाटांचे प्रादेशिक मनोरुग्णालय उभारण्यात येणार असून, त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून १० एकर जागा देण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे यांनी दिली. 

राज्यात सध्या प्रादेशिक स्तरावर चार मनोरुग्णालये आहेत. संपूर्ण मराठवाड्यासाठी एकही मनोरुग्णालय नाही. विशेष म्हणजे ब्रिटिशांच्या काळात जालना येथे कार्यरत असलेले प्रादेशिक मनोरुग्णलय हे ६० च्या दशकात राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे बंद झाले. तेव्हापासून म्हणजेच पाच दशकांपासून संपूर्ण मराठवाड्यात एकही प्रादेशिक मनोरुग्णालय नाही. त्यामुळेच मराठवाड्यासाठी प्रादेशिक मनोरुग्णालयाची गेल्या दोन ते तीन दशकांपासून कायम मागणी केली जात होती.

औरंगाबादसह मराठवाड्यातील प्रत्येक शहरांमध्ये रस्त्यारस्त्यांवर, कुठेतरी कोपऱ्यात, अस्वच्छतेत, ऊन-पावसात, थंडीमध्ये कितीतरी मनोरुग्ण दुर्लक्षित अवस्थेत पडून असतात. कमी-अधिक प्रमाणात मानसिक रुग्णांची संख्या प्रत्येक जिल्ह्यात आहे. त्यांच्यावर आंतररुग्ण उपचार व पुनर्वसन समुपदेशनासाठी गैरसोयीला तोंड द्यावे लागते. मनोरुग्णांना उपचारासाठी थेट पुणे गाठावे लागते. आजघडीला मराठवाड्यातील मनोरुग्णांना उपचारासाठी पुणे, मुंबई, नागपूर, रत्नागिरी ही शहरे गाठवी लागतात. अन्यथा खाजगी रुग्णालयांतील महागडे उपचार घ्यावे लागतात. यामुळे अनेकदा उपचारांकडेच दुर्लक्ष केले जाते. त्यातून रुग्णांची हेळसांड होते. परंतु जालना येथील प्रस्तावित रुग्णालयामुळे मनोरुग्णांना होणाऱ्या वेदना कमी होतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. रत्नागिरीच्या धर्तीवर हे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. वैद्यकीय अधीक्षकांपासून तर सफाईगारापर्यंत अशी २६३ अधिकारी-कर्मचाऱ्यांची पदे प्रस्तावित करण्यात आली आहेत. हे रुग्णालय औरंगाबादला उभारण्याची मागणी होत होती. 

आराखडा तयार होईलआरोग्य सुविधांसंदर्भात समतोल विकास साधला जात आहे. त्यादृष्टीने जालना येथे प्रादेशिक मनोरुग्णलय उभारण्यात येणार आहे. रुग्णालयासाठी १० एकर जागा मिळण्याची प्रक्रिया सुरू आहे. मनोरुग्णालयाचा आराखडा बनविला जाईल.-डॉ. स्वप्नील लाळे, आरोग्य उपसंचालक

मराठवाड्यासाठी महत्त्वपूर्णप्रादेशिक मनोरुग्णालय मराठवाड्यात व्हावे, ही पहिली मागणी होती. त्यानंतर ते औरंगाबादेत उभारण्यात यावे, अशी इच्छा होती. परंतु ते जालन्यात होत आहे, हेदेखील मोठी बाब आहे. जालना आणि औरंगाबाद जुळी शहरेच आहेत. अखेर या रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लागला. मराठवाड्यासाठी ते महत्त्वपूर्ण आहे.    -डॉ. अशोक बेलखोडे, सदस्य, मराठवाडा विकास मंडळ तथा अध्यक्ष, आरोग्य समिती

टॅग्स :hospitalहॉस्पिटलJalanaजालनाMarathwadaमराठवाडाdoctorडॉक्टर