महेश पाळणे , लातूरवर्षाकाठी जिल्हा क्रीडा संकुलाचे उत्पन्न विविध माध्यमांतून जवळपास १२ लाखांचे होते. त्या प्रमाणात जरी खर्च असला, तरी उत्तम नियोजन केल्यास संकुल समितीच्या मार्फतही क्रीडांगणाची देखभाल उत्तमरीत्या होऊ शकते, असे जाणकारांचे मत आहे. क्रीडा संकुलातील झालेल्या मैदानाच्या दुर्दशेबाबत ‘लोकमत’ने वृत्तमालिका प्रकाशित केल्यानंतर प्रशासनातही हालचाली सुरू झाल्या आहेत.मराठवाड्यातील एक उत्कृष्ट जिल्हा क्रीडा संकुल म्हणून लातूरची ओळख होय. मात्र गेल्या काही दिवसांपासून डबघाईला आलेल्या मैदानामुळे याची प्रतिमा बिघडली आहे. जिल्हा क्रीडा संकुलाच्या देखभालीची जबाबदारी संकुल समितीकडेच आहे. होणाऱ्या उत्पन्नातूनच क्रीडा संकुलाची देखभाल दुरुस्ती होते. क्रीडा संकुलातील उत्पन्नाबाबत पाहिले असता या ठिकाणी असलेल्या विविध माध्यमांतून वर्षाकाठी १२ लाखांचे उत्पन्न होते. यात संकुलातील २६ गाळ्यांचे सरासरी वर्षाकाठी उत्पन्न ४ लाखांच्या आसपास आहे. बॅडमिंटन हॉलचेही उत्पन्न जवळपास ५ लाखांच्या घरात आहे. ट्रॅकवरील मैदानाच्या भाड्याची कमाई दोन लाखांच्या आसपास आहे. (अधिक वृत्त हॅलो/२ वर)
उत्पन्न असूनही देखभालीचे वाजले बारा !
By admin | Updated: March 17, 2015 00:42 IST