शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
3
इकडे पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिली; तिकडे 'बेवफा' सोनम युपीत सापडली...
4
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
5
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
6
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
7
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
8
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
9
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची
10
आऊट देताच महिला अंपायरवर भडकला अश्निन, रागाच्या भरात पॅडवर मारली बॅट!
11
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
12
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
13
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
14
कुटुंबासोबत साजरी केली ईद, अचानक रुग्णालयात दाखल झाली 'बिग बॉस' विजेती अभिनेत्री
15
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
16
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
17
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
18
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
19
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती

एकाच कुुंटणखान्यावर बीडमध्ये पाचव्यांदा छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 00:11 IST

चार वेळेस छापा टाकल्यानंतरही खुलेआम वेश्या व्यवसाय चालविणा-या कुंटणखान्यावर शिवाजीनगर पोलिसांनी सहाव्यांदा धाड टाकली.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : चार वेळेस छापा टाकल्यानंतरही खुलेआम वेश्या व्यवसाय चालविणा-या कुंटणखान्यावर शिवाजीनगर पोलिसांनी सहाव्यांदा धाड टाकली. यामध्ये चार ग्राहकांसह तीन महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे. आंटी मात्र फरार आहे. ही कारवाई रविवारी सायंकाळी बीड शहरात करण्यात आली. ताब्यात घेतलेल्या महिला बीड व कोलकता येथील असल्याचे समोर आले आहे. शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शेख मदिनाबी शेख इफ्तेखार (बीड) असे कुंटणखाना चालविणा-या आंटीचे नाव आहे. मदिनाबी ही सरपण विक्रीचा व्यवसाय करते. एका पत्र्याच्या शेडमध्ये ती वेश्या व्यवसाय चालवित होती. यापूर्वी याच कुंटणखान्यावर तब्बल पाच वेळेस पोलिसांनी छापा टाकल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. पाच कारवायानंतरही ही आंटी पोलिसांच्या नाकावर टिच्चून हा वेश्या व्यवसाय चालवित असल्याचे समोर आले आहे.दोन महिन्यांपासून पोलीस या कुंटणखान्याची माहिती घेत होते. रविवारी खबरी पाठविला. पीडित महिलेने ५०० रूपये स्वीकारताच पोलिसांना त्याने इशारा केला. तात्काळ छापा टाकला असता चार पुरुषांसह तीन महिलांना ताब्यात घेतले.यातील दोन महिला मुळच्या कोलकता येथील रहिवासी असून सध्या अहमदनगरला स्थायिक आहेत. दरम्यान, या कारवाईने खळबळ उडाली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक सुधीर खिरडकर, पोनि घनश्याम पाळवदे, नानासाहेब लाकाळ, पोउपनि दीपाली गिते यांच्यासह दामिनी, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, शिवाजीनगर पोलिसांनी केली. दीपाली गिते यांच्या फिर्यादीवरून शेख मदिनाबी या आंटीविरूद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.