व्यंकटेश वैष्णव, बीडसातवी पासवर शिपाई पदाच्या जागा आहेत. मात्र उमेदवारांनी दहावी, बारावी व बीए चे मार्कमेमो जोडल्याचे कारण पुढे करत परिक्षा नियोजन समितीने शिपायांची भरती प्रक्रीया पुढे ढकलली आहे. शिवाय आरएएनएम च्या उमेदवारांची यादी दोन दिवसात तीनवेळा बदलल्याने नगर पालिकेची भरती प्रक्रीया वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. शिपाई पदासाठी आलेल्या उमेदवारांनी परीक्षा नियोजन समितीकडे याबाबत निवेदन देऊन मुलाखती रविवारीच घ्या, अशी मागणी केली आहे.राष्ट्रीय शहरी अभियान अंतर्गत नगर पालिकेच्या वतीने दोन दिवसापासून सुरू असलेल्या विविध पदांची भरती प्रक्रीया संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. शिपायाची एकूण ४ पदे आहेत. यासाठी सव्वशेच्या जवळपास उमेदवारांचे अर्ज आले होते. यातील ८० ते ८५ उमेदवारांनी दहावी, बारावीचे मार्कमेमो जोडलेले आहेत. गुणवत्ता यादी सातवी पासच्या मार्कमेमो काढली जाईल म्हणत शिपाई पदाच्या मुलाखती रद्द केल्या. दोन दिवसापासून उन्हात तळपत बसलेल्या उमेदवारांना शनिवारी मुलाखती न देताच परत जावे लागले.शनिवारपासून विविध १४ पदाच्या मुलाखती बीड पालिकेच्या वतीने घेण्यात येत आहेत.४एएनएम च्या पदासाठी शनिवारी ७१ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती. ४रविवारी लावलेल्या गुणवत्ता यादीतील एका उमेदवाराचे नाव वगळले असल्याचे निदर्शनास आले. ४७१ उमेदवारांची यादी ७० वर आल्याने उमेदवार संभ्रमात आहेत.
पालिकांची भरती प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात
By admin | Updated: May 25, 2015 00:29 IST