शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळातही तुघलकी वसुली !

By admin | Updated: November 25, 2015 23:21 IST

लातूर : सलग तीन वर्षांपासून दुष्काळाचा सामना करणाऱ्या लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आता महसूल विभागाच्या कर वसुलीचे संकट आहे.

लातूर : सलग तीन वर्षांपासून दुष्काळाचा सामना करणाऱ्या लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आता महसूल विभागाच्या कर वसुलीचे संकट आहे. उपकराच्या नावाखाली गावोगाव ही वसुली केली जात आहे. एकिकडे दुष्काळ आणि दुसरीकडे करवसुली अशा दुहेरी कचाट्यात जिल्ह्यातील शेतकरी अडकला आहे. महसूल विभागाकडून जमीन महसूल वसुलीला स्थगिती असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र इतर वसुली सक्तीने केली जात असल्याचे समोर आले आहे. या वसुली विरोधात शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.लातूर जिल्ह्यातील जळकोट, उदगीर, देवणी, अहमदपूर आणि चाकूर या तालुक्यांतील जमिनी या माळरान आणि कोरडवाहू असल्यामुळे दुष्काळाचा पहिला फटका या भागातील शेतकऱ्यांना बसतो. मांजरा काठावरील शेती सुपीक असली, तरी पाण्याअभावी याही परिसरात मोठे हाल आहेत. सातत्याने पडणाऱ्या अल्प पावसामुळे आजचा दुष्काळ अधिक भयावह आहे. अशा दुष्काळात शासनाकडून मदत आणि मानसिक आधाराची गरज असताना महसूल विभागाच्या पथकाकडून, मंडळ अधिकारी, तलाठ्याकडून उपकराच्या नावाखाली सक्तीची वसुली केली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. दुष्काळामुळे खरीप आणि रबीचा हंगाम पूर्णपणे हातचा गेला आहे. ज्या शेतीमध्ये या हंगामावर करण्यात आलेला खर्चही निघाला नाही, अशा परिस्थितीत शेतीतील उत्पादनाचा विचार न करता महसूल विभागाच्या वतीने वेगवेगळे कर सक्तीने लादले जात आहेत. या कराच्या वसुलीसाठी गावा-गावांत महसूल विभागाचे कर्मचारी फिरत आहेत. निलंगा तालुक्यातील जवळपास सर्वच गावांमध्ये या वसुलीसाठी गेल्या चार दिवसांपूर्वी महसूल प्रशासनाने दवंडी देऊन महसूल भरण्यासंदर्भात तगादा लावला आहे. शेतकऱ्यांनी आपला कर भरावा, असे आवाहन दवंडीच्या माध्यमातून प्रशासनाने केले आहे. दुष्काळात होरपळून निघणाऱ्या शेतकऱ्यांकडे दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असताना हा कर कोठून भरायचा, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. दुष्काळाशी दोन हात करताना दमछाक झालेल्या शेतकऱ्यांना आता जगणे मुश्किल झाले आहे. (प्रतिनिधी)