जालना: शासनाच्या आदेशानुसर नगर पालिकेकडून विशेष कर वसुली मोहीम राबविण्यात येत असून दहा पथकांकडून १ ते २८ फेब्रुवारी दरम्यान सुमारे ७० लाखांची कराची वसुली करण्यात आली तर ११ मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत.नगर पालिकेची विविध करापोटी सुमारे २० कोटींपेक्षा अधिक रक्कम अनेक वर्षांपासून थकित आहे. सुमारे ५५ हजार मालमत्तांची पालिकेकडे नोंद आहे. वेळोवेळी पथकांचे नियोजन करूनही वसुलीचा टक्का वाढलेला नाही. शासनाने दोन महिन्यांसाठी नगर पालिकांसाठी विशेष कर वसुली अभियान राबविले आहे. त्यानुसार थकित मालमत्तांच्या कर वसुलीसाठी दहा पथकांची स्थापना करण्यात आली आहे. पथकाने ११ मालमत्ता जप्त केल्या आहेत. त्यात हिरालाल कवा, अमर अमित रोलिंग मिल, सम्राट सिलिंडर, फाईन आर्ट कंपनी, हरिओम स्टिल इंडस्ट्रीज, आदिनाथ यांची मालमत्ता, भूषण राठोड, लंकाबाई मदन, कलंदर खा गुलाब खा, अ. रहीम अ. अमोनोद्दीन चौधरी, हिरालाल किल्लेदार आदींची मालमत्ता जप्त करण्यात आली. १५६ नुसार या मालमत्ता जप्त करण्यात आल्या असून, नगर पालिकेने सदर लिलावाची प्रक्रिया पूर्ण केली असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने या मालमत्तेचा लिलाव करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर व कर अधीक्षक हरिश्चंद्र आंधळे यांनी सांगितले. कर वसुलीसाठी थकबाकीदाराच्या घरासमोर बँड वाजविण्यात येणार असून अनधिकृत मोबाईल टॉवर कंपनीकडून दुप्पटीने कर वसुली केली जाणार असल्याचे नगर पालिकेडून सांगण्यात आले.
महिनाभरात पालिकेची ७० लाखांची वसुली
By admin | Updated: March 10, 2017 00:22 IST