शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
2
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
3
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
4
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
5
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
6
धक्कादायक! जो समोर आला, त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
7
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
8
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
9
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
10
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
11
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत काढला पळला; चंद्रपुरातील घटना
12
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
13
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
14
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
15
Priya Saroj Rinku Singh: रिंकूने अंगठी घालताच प्रिया सरोज यांना अश्रू अनावर; बघा साखरपुड्यातील व्हिडीओ
16
राजा रघुवंशीची हत्या, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
17
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
18
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
19
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
20
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या

जैविक कचऱ्याची वसुली मनपाकडे

By admin | Updated: December 22, 2015 00:08 IST

औरंगाबाद : जैविक कचऱ्याची विल्हेवाट आणि वसुलीत अनियमितता झाल्याच्या कारणावरून वॉटर ग्रेस कंपनीला नोटीस बजावल्यानंतर आता मनपाने संबंधित कंपनीला

औरंगाबाद : जैविक कचऱ्याची विल्हेवाट आणि वसुलीत अनियमितता झाल्याच्या कारणावरून वॉटर ग्रेस कंपनीला नोटीस बजावल्यानंतर आता मनपाने संबंधित कंपनीला दिलेले वसुलीचे अधिकारही काढले आहेत. मूळ कराराप्रमाणे शहरातील हॉस्पिटलकडून यापुढे मनपाने शुल्क वसुली करावी, असे आदेश स्थायी समिती सभापती दिलीप थोरात यांनी सोमवारी दिले. मनपाने शहरातील जैविक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी नाशिक येथील वॉटरग्रेस कंपनीसोबत २० वर्षांचा करार केलेला आहे. त्यानुसार २००३ सालापासून ही कंपनी मनपासाठी काम करीत आहे. शहरातील हॉस्पिटलमधून निर्माण होणारा जैविक कचरा गोळा करून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याची जबाबदारी या कंपनीवर सोपविण्यात आलेली आहे. त्या बदल्यात मनपा शहरातील हॉस्पिटलकडून दर महिन्याला ठराविक शुल्क वसूल करते. हे शुल्क २००७ सालापर्यंत मनपा स्वत:च वसूल करीत होती. त्यानंतर त्यातून २५ टक्के रक्कम काढून उर्वरित ७५ टक्के रक्कम कंपनीला दिली जात होती. पुढे २००७ साली वसुलीचे कामही कंपनीकडेच सोपविण्यात आले. तेव्हापासून वॉटरग्रेस कंपनीच शहरातील हॉस्पिटल्सकडून शुल्क वसुली करते. दरम्यान, काही दिवसांपासून मनपाच्या पदाधिकाऱ्यांनी कंपनीच्या प्लांटला भेट देऊन पाहणी केली. तेव्हा तेथे जैविक कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावली जात नसल्याचे तसेच नोंद ठेवली जात नसल्याचे समोर आले. त्यानंतर मनपाच्या अधिकाऱ्यांनी कंपनीत जाऊन पंचनामा केला. त्यातही काही अनियमिततांचा नोंद झाली. त्यानुसार मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कंपनीला नुकतीच कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच कंपनीवर ब्लॅक लिस्टमध्ये समाविष्ट करण्याची कारवाई केली जाईल, असा इशाराही या नोटीसमध्ये देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर स्थायी समितीच्या बैठकीतही कंपनीच्या कारभाराचा मुद्दा उपस्थित झाला. कंपनीच परस्पर हॉस्पिटलकडून वसुली करीत असल्यामुळे आणि मनपाला त्याची माहिती कळवीत असल्यामुळे वसुलीच्या रकमेत तफावत असण्याची शक्यता काही सदस्यांनी व्यक्त केली. तसेच मूळ कराराप्रमाणे मनपानेच वसुलीचे काम करावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. त्यानंतर सभापती थोरात यांनी शहरातील हॉस्पिटलकडून जैविक कचऱ्याची शुल्क वसुली पूर्वीप्रमाणे मनपानेच करावी, असे आदेश दिले.