शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

रेकॉर्ड ब्रेक ! औरंगाबाद जिह्यात मंगळवारी ५५० कोरोना रुग्णांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 13:44 IST

Record break corona patients increased on single day in Aurangabad कोरोना विळख्याच्या ११ महिन्यांत जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात रेकॉर्ड ब्रेक तब्बल ५५० नव्या कोरोना रुग्णांची भर पडली

ठळक मुद्देमंगळवारी उपचारादरम्यान ८ जणांचा मृत्यू सध्या जिल्ह्यात ३,२२१ रुग्णांवर सुरू उपचार

औरंगाबाद : कोरोना विळख्याच्या ११ महिन्यांत जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात रेकॉर्ड ब्रेक तब्बल ५५० नव्या कोरोना रुग्णांची भर पडली, तर तब्बल ३७३ जण कोरोनामुक्त झाले. उपचार सुरू असताना जिल्ह्यातील ८ रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या ३,२२१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या आता ५३ हजार ९०७ झाली आहे, तर आतापर्यंत ४९ हजार ३८२ रुग्ण कोरोनामुक्त झाले. एकूण १,३०४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या ५५० रुग्णांत सर्वाधिक मनपा हद्दीतील ४६२, तर ग्रामीण भागातील ८८ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील तब्बल ३३७ आणि ग्रामीण भागातील ३६, अशा एकूण ३७३ रुग्णांना मंगळवारी सुटी देण्यात आली. उपचार सुरू असताना मोरहिरा येथील ३२ वर्षीय पुरुष, वैजापुरातील ७५ वर्षीय पुरुष, चैतन्यनगर, सिडकोतील ४९ वर्षीय स्त्री, रेल्वेस्टेशन परिसरातील ५१ वर्षीय स्त्री, उस्मानपुरा येथील ८४ वर्षीय पुरुष, कन्नड तालुक्यातील माळीवाडा येथील ६५ वर्षीय पुरुष, शहरातील नॅशनल कॉलनीतील ७० वर्षीय पुरुष आणि ६९ वर्षीय पुरुष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्णएन दोन सिडको ४, शासकीय कर्करोग रुग्णालय परिसर १, सिडको २, गारखेडा ७, ब्रिजवाडी १, सातारा परिसर ११, एसआरपीएफ कॅम्प १, शंकुतलानगर १, आविष्कार कॉलनी १, जाधववाडी ३, पडेगाव ३, हिमायतबाग ५, एन सात येथे २, एन सहा येथे ८, खडकेश्वर १, नागेश्वरवाडी २, कॅनॉट प्लेस १, काल्डा कॉर्नर २, राणानगर १, संजयनगर २, मिलिटरी हॉस्पिटल १, भारतमातानगर १, बालाजीनगर ५, अमृतसाई प्लाझाच्या मागे, रेल्वेस्टेशन परिसर १, उस्मानपुरा २, रेल्वेस्टेशन परिसर १, आकाशवाणी कॉलनी २, जयभवानीनगर ४, एमजीएम हॉस्पिटल परिसर २, तापडियानगर २, एन दोन ठाकरेनगर २, पारिजातनगर १, गारखेडा, शिवनेरी कॉलनी २, मयूरपार्क ५, शहानूरवाडी ४, नक्षत्रवाडी ३, गुलमोहर कॉलनी १, एसबी कॉलनी वेस्ट २, टिळकनगर ३, म्हाडा कॉलनी, धूत हॉस्पिटलजवळ, म्हाडा कॉलनी २, एन चार येथे ५, एन तीन येथे ३, अरुणोदय कॉलनी १, तोरणागडनगर १, एन वन येथे ५, एन पाच सिडको २, हनुमाननगर १, उत्तरानगरी, चिकलठाणा २, खडकेश्वर १, एन तीन, कामगार चौक, सिडको २, प्रकाशनगर १, एमआयडीसी चिकलठाणा १, इटखेडा २, शेंद्रा २, बीड बायपास ५, शकुंतलानगर १, समर्थनगर ३, वेदांतनगर ३, विराजनगर १, गुलमंडी १, श्रीकृष्णनगर, हडको १, शहागंज १, कासलीवाल मार्बल ३, शिवाजीनगर ४, उल्कानगरी ७, रेणुकानगर १, छत्रपती नगर ३, सवेरा कंपनी परिसर २, विद्यानगर १, अलंकार हा.सो १, पुंडलिकनगर १, जाधवमंडी १, जय भवानी विद्या मंदिर परिसर १, ज्ञानेश्वरनगर १, इंदिरानगर १, विजयनगर १, खिंवसरा पार्क १, मिटमिटा २, दशमेशनगर २, व्यंकटेश कॉलनी १, केंब्रिज स्कूल परिसर २, अशोकनगर २, बालकृष्ण नगर २, मयूरनगर १, एन बारा सिडको १, हर्सुल ५, तुळजाभवानी चौक १, सौभाग्य चौक १, एन तेरा येथे १, एन अकरा येथे २, भगतसिंगनगर १, भावसिंगपुरा १, संभाजी कॉलनी एन सहा येथे १, हडको ३, एन आठ, जिव्हेश्वर कॉलनी १, पिसादेवी १, हरसिद्धी मातानगर १, फाजिलपुरा २, एन नऊ येथे २, दर्गा रोड १, एम दोन, टीव्ही सेंटर १, कांचनवाडी ७, पंचशीलनगर १, न्यू भीमाशंकर कॉलनी १, जटवाडा रोड १, अष्टविनायकनगर १, संषर्ष नगर २, बंजारा कॉलनी २, ओमश्री गणेशनगर १, विष्णूनगर २, एन आठ येथे १, एमआयटी कॉलेज १, स्वराजनगर, मकुंदवाडी १, गादिया विहार १, पंचवटी हॉटेल परिसर १, कोकणवाडी १, धावणी मोहल्ला १, विश्वभारती कॉलनी १, बन्सीलालनगर ३, दिशा सिल्क सिटी, पैठण रोड १, घाटी परिसर १, प्रतापनगर १, संदेशनगर १, देवळाई २, स्वातंत्र्य सैनिक कॉलनी, नागेश्वरवाडी २, एन बारा हडको १, एमआयटी कोविड केअर सेंटर १, पेशवेनगर ३, औरा व्हिलेज १, सूतगिरणी चौक परिसर २, पद्मपुरा १, स्नेहनगर १, देवानगरी १, अन्य १९७

ग्रामीण भागातील रुग्णवैजापूर १, बिडकीन १, कन्नड २, नाथविहार पैठण १, गंगापूर २, रांजणगाव २, खुलताबाद २, फुलंब्री १, वाळूज २, शेणपूजी, गंगापूर १, तालवाडी, वेरूळ १, सिडको महानगर एक येथे ४, बजाजनगर ९, म्हाडा कॉलनी, तिसगाव १, साऊथ सिटी २, लासूर स्टेशन १, सावंगी १, देवगाव रं १, अन्य ५३.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद