तामलवाडी : शेताच्या कारणावरून लाकूड, काठी, रूमणे, लोखंडी गजाने झालेल्या मारहाणीत चौघे जखमी झाले़ ही घटना शनिवारी सकाळी सांगवी काटी (ता़तुळजापूर) येथे घडली़पोलिसांनी सांगितले की, सांगवी काटी शिवारातील शेतातील रस्त्यावर समीर साहेबलाल शेख यांना बाबुलाल उस्मान शेख, निजाम उस्मान शेख, शब्बीर उस्मान शेख, चाँद उस्मान शेख, अहमोद्दीन बाबूलाल शेख, शरपुद्दीन बाबूलाल शेख, बाबासाहेब निजाम शेख, मुसा निजाम शेख, खुदबोद्दीन चाँद शेख, रहीम शब्बीर शेख, सद्दाम शब्बीर शेख (सर्व रा़ सांगवीकाटी) यांनी ‘तुला वरचे शेत पाहिजे काय असे म्हणत शिवीगाळ करून लाकडाने मारहाण केली़ तर भांडण सोडविण्यास आलेल्या साहेबाल शेख, बशीर साहेबलाल शेख, रशीद साहेबलाल शेख यांनाही काठीने, रूमण्याने, लोखंडी गजाने मारहाण करून गंभीर जखमी केले़ या प्रकरणी जखमी समीर शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील ११ जणाविरूध्द तामलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोहेकॉ तुळजापुरे हे करीत आहेत़ (वार्ताहर)
शेतीच्या कारणावरून गज, रूमण्याने मारहाण
By admin | Updated: July 21, 2014 00:23 IST