शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
3
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
4
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
5
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
6
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
7
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
8
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
9
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
10
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
11
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
12
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
13
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
15
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
16
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
17
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
18
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
19
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
20
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य

अहो आश्चर्यम़़़् जिल्ह्यातील ७०६ गर्भपाताचे कारण एकच !

By admin | Updated: March 24, 2017 00:21 IST

लातूर खाजगी दवाखान्यातील एमटीपी सेंटरमध्ये गर्भपात करण्याचे प्रमाण अधिक असून एप्रिल २०१६ ते जानेवारी २०१७ या ११ महिन्याच्या कालावधीत ९९५ गर्भपात जिल्ह्यात झाले आहेत़

हणमंत गायकवाड लातूरसरकारी रुग्णालयांपेक्षा शासनमान्य खाजगी दवाखान्यातील एमटीपी सेंटरमध्ये गर्भपात करण्याचे प्रमाण अधिक असून एप्रिल २०१६ ते जानेवारी २०१७ या ११ महिन्याच्या कालावधीत ९९५ गर्भपात जिल्ह्यात झाले आहेत़ त्यातील ११८ सरकारी दवाखान्यात तर ८७७ खाजगी एमटीपी सेंटरमध्ये गर्भपात केले आहेत़ खाजगी रुग्णालयात गर्भपात करून घेण्याचा आकडा अधिक कसा असा प्रश्न यंत्रणेला पडला आहे़ वेगवेगळ्या ५ कारणांवर गर्भपात करण्यास परवानगी आहे़ मात्र लातूर जिल्ह्यात झालेल्या ९९५ पैकी ७०६ गर्भपात एकाच कारणावरून झाल्याचे निदर्शनास आल्याने यंत्रणेचा संशय बळावला आहे़ परिणामी, या सर्व गर्भपाताच्या केसेस संशयाच्या भोवऱ्यात अडकल्या असून, आता धडक मोहिमेत त्याची तपासणी होणार आहे़ लातूर जिल्ह्यात ११६ गर्भपात केंद्र आहेत़ त्यात लातूर शहरात ७२, उदगीर १६, निलंगा ८, अहमदपूर ७, औसा ३, चाकूर २, रेणापूर १, देवणी १, जळकोट १, मुरूड २, किल्लारी १, बाभळगाव १, कासारशिरसी १, असे खाजगी व सरकारी मिळून ११६ गर्भपात केंद्र आहेत़ या गर्भपात केंद्रामध्ये अधिकृतपणे एप्रिल २०१६ ते जानेवारी २०१७ या ११ महिन्याच्या कालावधीत ९९५ गर्भपात करण्यात आले़ त्यात १ ते १२ आठवड्यापर्यंतचे ८८४ आणि दोन आठवडे ते १३ आठवड्यापर्यंत १४७ गर्भपात करण्यात आले आहेत़मातेला धोका असेल, मातेच्या शरीराला गंभीर दुखापत झाली असेल, मातेला मानसिक आजार झालेला असेल, बलात्कारामुळे गरोदरपण आले असेल आणि गर्भनिरोधक साधनांचा वापर करूनही गर्भधारणा झाली असेल या पाच कारणास्तव गर्भपात करण्याचा अधिकार आहे़ लातूर जिल्ह्यात झालेले बहुतांश गर्भपात गर्भनिरोधक साधनांचा वापर करून गर्भधारणा झाल्यामुळे केले आहेत़ ९९५ पैकी ७०६ गर्भपात याच कारणास्तव झाले आहेत़