शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

भाड्याने माणसे, वाहने नेण्याची खऱ्या शिवसेनेला गरज नाही; अंबादास दानवेंचा शिंदे गटाला टोला

By बापू सोळुंके | Updated: September 30, 2022 14:24 IST

शिवसैनिक सोबत चटणीभाकर घेऊन उत्स्फूर्तपणे मेळाव्याला जात असतो. यापुढेही जात राहील.

औरंगाबादमुंबईतील शिवतीर्थावर शिवसेनेचा दसरा मेळावा होत आहे, या मेळाव्याला दरवर्षी संपूर्ण राज्यातून शिवसैनिक आणि नागरिक उत्स्फूर्तपणे जातात. त्यामुळे शिवसेनेला भाड्याने माणसे आणि वाहने घेऊन जाण्याची गरज नसल्याचा टोला, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते तथा शिवसेना जिल्हाप्रमुख आ. अंबादास दानवे यांनी शिंदे गटाला लगावला.

मुंबईत शिवसेनेचा दसरा मेळाव्याला जास्तीतजास्त लोक येथून नेण्याची तयारी शिवसेनेने सुरू केली आहे. यासाठी शुक्रवारी शहरातील  शिवसेनेच्या क्रांती चौक येथील संपर्क कार्यालयात औरंगाबाद मध्य आणि पश्चिम विभागातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची तर पूर्व विभागाची बैठक पुंडलिकनगर येथील मंगल कार्यालयात पार पडली. या बैठकीप्रसंगी दानवे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले बंडखोर गटाने मुंबईत दसरा मेळाव्याचे आयोजन केल्याचे आणि या मेळाव्यासाठी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी एसटी महामंडळाला पत्र देऊन बसची मागणी केल्याचे पत्र व्हायरल झाले. मात्र यासाठी पैसे भरल्याची पावती मात्र त्यांनी टाकली नाही. शिंदे गट 25 हजार लोकांना दसरा मेळाव्याला नेणार असल्याचे आणि याकरिता काही वाहने बुक केल्याच्या बातम्या वाचल्या. शिवसेनेला अशा प्रकारे दसरा मेळाव्यासाठी माणसे आणि गाड्या भाड्याने घेण्याची गरज पडली नाही.

शिवसैनिक सोबत चटणीभाकर घेऊन उत्स्फूर्तपणे मेळाव्याला जात असतो. यापुढेही जात राहील. आजच्या बैठकीत केवळ जास्तीत जास्त शिवसैनिक आणि नागरिकांनी  मुंबईला जाण्याचे नियोजन करावे, हे सांगण्यासाठी मेळाव्याचे आयोजन केल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी दानवे यांनी उपस्थित प्रत्येकानी दहा जण  मुंबईला घेऊन जायचे असल्याचे सांगितले. या मेळाव्यास राजू वैद्य, संतोष खेडके, ज्ञानेश्वर डांगे, वामनराव शिंदे, दिग्विजय शेरखाने,  शिवसेनेचे पदाधिकारी, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख प्रतिभा जगताप, माजी महापौर कला ओझा, मीरा देशपांडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेAurangabadऔरंगाबादShiv Senaशिवसेना