शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

जगभरातील विचारवंतांनी मांडलेले महात्मा गांधी वाचा महाराष्ट्र गांधी स्मारक निधी समितीच्या ग्रंथातून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 15:50 IST

हे दोन ग्रंथ गांधीजींच्या स्मृतिदिनानिमित्त औरंगाबादेतील गांधी स्मारक निधी भवनात उपलब्ध झाले आहेत.

ठळक मुद्देगांधी विचाराचा प्रसारासाठी महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचा उपक्रम

- राम शिनगारे 

औरंगाबाद : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे विचार, त्यांच्याविषयी जगभरातील तत्त्वज्ञ, विचारवंतांनी केलेले लिखाण आणि गांधी तत्त्वज्ञानातून सर्वसामान्यांना पडणाऱ्या प्रश्नांचे उत्तर संग्रहित दोन ग्रंथांत मिळणार आहे. नांदेड येथील लेखक जे. आर. कोकंडाकर यांनी मेहनत घेत जगभरातील  व्यक्तींच्या लेखांचे संकलन आणि प्रश्नोत्तरे तयार केली. त्यास महाराष्ट्र गांधी स्मारक निधी समितीने ग्रंथ रूपात प्रकाशित केले आहे. हे दोन ग्रंथ गांधीजींच्या स्मृतिदिनानिमित्त औरंगाबादेतील गांधी स्मारक निधी भवनात उपलब्ध झाले आहेत.

महात्मा गांधी यांचा ३० जानेवारी हा स्मृती दिन. हे औचित्य साधत महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे नागपूर, अमरावती आणि औरंगाबादेतील गांधी स्मारक निधीच्या उपकेंद्रांमध्ये दोन ग्रंथ उपलब्ध करून दिले आहेत. नांदेडच्या स्टेट बँक ऑफ हैदराबादमध्ये लिपिक असलेले कोकंडाकर यांनी स्वेच्छानिवृत्ती घेत गांधी विचारांच्या प्रसारासाठी कार्य सुरू केले. त्यांनी ४० ते ५० वर्षांपूर्वी जगभरातील विचारवंत, तत्त्वज्ञांनी गांधींविषयी लिहिलेल्या ५० लेखांचे संकलन केले. यात १९०८ साली दक्षिण आफ्रिकेतील प्रसिद्ध लेखक जोसेफ जे डोक यांनी गांधीजींवर लिहिलेल्या चरित्रात्मक लेखाचा समावेश आहे.

याशिवाय  फ्रेंच लेखक रोमा रोल, सी.एफ. अ‍ॅड्र््यूज, लाईश फिशर, विनोबा भावे, मीरा बेन, मुल्कराज आनंद, सर्वपल्ली राधाकृष्णन, प्यारेलाल आदींच्या लेखांचा समावेश आहे. ६६७ पानांच्या या ग्रंथाचे नाव ‘अंडरस्टॅडिंग दी महात्मा’ असे आहे. ९१ वर्षांचे ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत एस. एन. सुब्बाराव यांची प्रस्तावना आहे. दुसरा ग्रंथ ‘नोइंग महात्मा गांधी क्वश्चन अ‍ॅण्ड अ‍ॅन्सर’ हा ४४७ पानांचा असून त्यात तब्बल १५०० प्रश्न व त्यांची उत्तरेही देण्यात आली आहेत. हे प्रश्न गांधीजींच्या कार्याविषयी आहेत. यातून महात्मा गांधी यांचे चरित्र, विचार, आचार याचे आकलन वाचकांना होईल, असे मत लेखक कोकंडाकर यांनी व्यक्त केले. या ग्रंथाला गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांची प्रस्तावना आहे. गांधी स्मृतिदिनानिमित्त हे ग्रंथ सवलतीच्या दरात औरंगाबादेतील गांधी स्मारक भवनात उपलब्ध असल्याची माहिती संचालक डॉ. मच्छिंद्र गोर्डे यांनी दिली.

गांधीजींवर  १३ पुस्तकांचे लिखाणउपरोक्त दोन ग्रंथांशिवाय याशिवाय  कोकंडाकर यांनी महात्मा गांधी यांच्यावर तब्बल १३ ग्रंथ लिहिले आहेत. 

अभ्यास न करताच विरोध आजच्या जगाला सावरण्यासाठी गांधी विचारच आवश्यक आहे. गांधीजींविषयी अनेक आक्षेप घेतले जातात. मात्र हे आक्षेप अज्ञानातून असतात. गांधीजींचे साहित्य वाचल्यास सगळे वादाचे मुद्दे गळून पडतील. मात्र, गांधी अभ्यास न करताच विरोध केला जातो. सत्य, अहिंसा ही तत्त्वे वगळल्यास जगात हाहाकार माजेल. यामुळेच गांधी विचार महत्त्वाचे वाटतात. त्यासाठीच कार्य करतो.- जे. आर. कोकंडाकर, लेखक  

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीliteratureसाहित्यAurangabadऔरंगाबाद