शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

बीबी का मकबरा परिसरात पुन्हा उत्खनन सुरू; अवशेषांचे रहस्य उलगडणार

By संतोष हिरेमठ | Updated: February 14, 2024 19:44 IST

बीबी का मकबरा परिसरात यापूर्वी दोन वेळा खोदकाम करण्यात आले. येथे पुरातत्त्व अवशेष सापडले.

छत्रपती संभाजीनगर : बीबी का मकबरा परिसरात नेमके काय दडले आहे, याचा शोध घेण्यासाठी पुन्हा एकदा उत्खनन सुरू करण्यात आले आहे. या उत्खननातून या जागेच्या इतिहासाचे आणि येथील अवशेषांचे काळाच्या उदरात गडप झालेले रहस्य उलगडण्याची अपेक्षा आहे.

बीबी का मकबरा परिसरात यापूर्वी दोन वेळा खोदकाम करण्यात आले. येथे पुरातत्त्व अवशेष सापडले. परंतु, काम अर्धवट राहिल्याने सापडलेला इतिहास पुन्हा मातीत हरविल्याची परिस्थिती बनली. याविषयी ‘लोकमत’ने १४ डिसेंबर २०२३ रोजी ‘अर्धवट उत्खनन करा अन् नंतर विसरा, सापडलेल्या इतिहासाला पुन्हा मूठमाती’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले. अखेर पुरातत्त्व सर्वेक्षणने या ठिकाणी पुन्हा उत्खननाचे काम हाती घेतले.

यापूर्वी कधी खोदकाम?- २००५ ते २००९ या कालावधीतील अधीक्षकांनी बीबी का मकबऱ्यासमोरील जागेत काही पुरातत्त्व अवशेष असल्याची शक्यता व्यक्त केली होती. त्यानुसार वरिष्ठ कार्यालयाकडे पत्रव्यवहार करून खोदकाम करण्यात आले.- १४ सप्टेंबर २०२१ रोजी मकबऱ्यासमोरील उजव्या बाजूला असलेल्या उंचवट्यावर ४० मीटर बाय ४० मीटर परिसरात उत्खनन करण्यात आले होते.- फेब्रुवारी २०२३ मध्ये या ठिकाणी पुन्हा उत्खनन सुरू करण्यात आले. परंतु काही दिवसांत हे कामही थांबले.

आतापर्यंत उत्खननात काय सापडले?चार ते सहा फूट खोलपर्यंत उत्खनन करून मलबा हटविण्यात आला. तेव्हा विटा, चुना, दगडी मध्ययुगीन बांधकामाचे अवशेष उघडे पडले. या ठिकाणी मकबरा बांधकाम काळातील स्नानगृह, शौचालयासारखा दगडी, चुन्याचे बांधकाम असलेला पाया इ. अवशेष आढळले. आता उत्खननातून आणखी उलगडा होईल.

किमान १५ दिवस लागतीलया ठिकाणी नेमके काय आहे, हे स्पष्ट होण्यासाठी किमान १५ दिवसांचा कालावधी लागेल.- डाॅ. शिव कुमार भगत, अधीक्षक (अधीक्षण पुरातत्त्वविद), भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण

टॅग्स :AurangabadऔरंगाबादArchaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षणBibi-ka-Maqbaraबीबी का मकबरा