लातूर : नागपूर येथे जिल्हा प्रशासन अधिकारी पदावर कार्यरत असलेले रविंद्र पांढरे यांची लातूर मनपाचे नवे आयुक्त म्हणून बदली झाली आहे. ते उद्या शुक्रवारी लातूर आयुक्त पदाचा पदभार घेणार आहेत. राज्य शासनाच्या नगर विभागाने त्यांना नागपूर येथील पदावरून तात्काळ कार्यमुक्त होऊन लातूर मनपा आयुक्तपदाचा पदभार घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार ते उद्या शुक्रवारी आयुक्त पदाचा पदभार घेणार आहेत. ३१ आॅगस्ट रोजी राज्य शासनाने हे आदेश निर्गमित केले असून, जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्याकडून रविंद्र पांढरे आयुक्त पदाचा पदभार घेणार आहेत.
लातूर मनपाचे रविंद्र पांढरे नवे आयुक्त
By admin | Updated: September 1, 2016 01:14 IST