हिंगोली : उत्पादकांच्या हातात माल येताच हळदीचे भाव घसरण्यास सुरूवात झाली. मागील आठवड्यापासून सातत्याने दर घसरण्यास सुरूवात झाली असताना जवळपास १ हजारांचा फटका क्विंटलमागे उत्पादकांना बसत आहे. शनिवारी झालेल्या लिलावात कमाल ५ हजार ६०० रूपये तर किमान ४ हजार ५०० रूपयांपर्यंत भाव गेला. हिंगोली जिल्ह्यात हळदीचे क्षेत्र कमी प्रमाणात आहे; परंतु बाहेरच्या जिल्ह्यातून विक्रीसाठी येणाऱ्या हळदीची आवक मोठ्या प्रमाणात आहे. प्रत्येक दिवशी हजारोंच्यावर क्विंटल हळद विक्रीसाठी येत असल्यामुळे राज्यात दुसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ म्हणून हिंगोलीला ओळखले जाते. सध्या या बाजारपेठेत नवीन हळदीचा आवक सुरू झाली आहे; पण हळदीचे भाव घसरण्यास सुरूवात झाली आहे. मागील पंधरवड्याच्या तुलनेत हळदीचे दर या आठवड्यात घसरले आहेत. शनिवारी झालेल्या लिलावात उत्पादकांची निराशा झाली. सकाळी ४ हजार ५०० रूपयांपासून लिलावास प्रारंभ झाला. मालाच्या दर्जानुसार त्यात वाढ होवून ५ हजार ६०० रूपयांपर्यंत भाव गेला. हळदीचा हंगाम सुरू झाल्याने मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. यापूर्वी एक ते दीड हजारापर्यंत होणारी आवक आता पाच हजारांच्या घरात गेली आहे. शनिवारी साडेचार हजार क्विंटलची खरेदी झाली. हिंगोलीपेक्षा वसमत बाजार समितीत गुरूवारी उत्पादकांना चांगला भाव मिळाला. हिंगोलीत ४ हजार ३०१ तर वसमतमध्ये ५ हजार २०० रूपयांपासून लिलावास सुरूवात झाली होती. त्यानंतरही भाव वाढत जावून वसमत येथे ६ हजार ५०० रूपयांपर्यंत कमाल दर गेला होता. उलट हिंगोलीत ५ हजार ६०० रूपयांपर्यंत भाव वाढला. नांदेड बाजार समितीत देखील गुरूवारी हिंगोलीपेक्षा १०० रूपयांनी भाव वाढले होते. आवक कमी असतानाही ४ हजार ४७५ रूपयांपासून लिलावास सुरूवात झाली. शेवटी कमाल दर ५ हजार ७०० रूपयांपर्यंत गेला. मागील पंधरवाड्यात साडेसहा हजारांच्या पुढे हळदीचे भाव होते. यंदा हळदीला बऱ्यापैकी भाव मिळेल, अशी अपेक्षा होती; परंतु नेहमीप्रमाणे उत्पादकांच्या हातात माल येईपर्यंत भाव घसरण्यास सुरूवात झाली. सध्या १ हजारांची तफावत दरांत निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)हिंगोली जिल्ह्यात हळदीचे क्षेत्र कमी प्रमाणात आहे; परंतु बाहेरच्या जिल्ह्यातून विक्रीसाठी येणाऱ्या हळदीची आवक आहे मोठ्या प्रमाणात. हिंगोली बाजारपेठेत नवीन हळदीचा आवक सुरू झाली; पण हळदीचे भाव घसरण्यास झाली सुरूवात. गत पंधरवड्याच्या तुलनेत सध्या हळदीचे घसरले असताना आवक वाढून शनिवारी साडेचार हजार क्विंटलची खरेदी झाली. शनिवारी झालेल्या लिलावात सकाळी ४ हजार ५०० रूपयांपासून प्रारंभ झालेल्या लिलावात मालाच्या दर्जानुसार वाढ होवून ५ हजार ६०० रूपयांपर्यंत गेला भाव. वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीत ५ हजार २०० रूपयांपासून लिलावास सुरूवात झाली होती. त्यानंतर भाव वाढत जावून उत्पादकांना मिळाला ६ हजार ५०० रूपयांचा कमाल दर. नांदेड बाजार समितीत देखील गुरूवारी हिंगोलीपेक्षा १०० रूपयांनी भाव वाढले होते. त्यात आवक कमी असतानाही ४ हजार ४७५ रूपयांपासून सुरूवात झालेला लिलाव शेवटी गेला ५ हजार ७०० रूपयांपर्यंत.
हळदीचे दर हजाराने घसरले
By admin | Updated: June 8, 2014 00:32 IST