शहरं
Join us  
Trending Stories
1
GT 'टायटन्स' जहाज बुडता बुडता वाचलं! हार्दिकच्या चुकीमुळं MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

आरटीई प्रवेशासाठी द्यावे लागणार अंतराचे कागदपत्र!

By admin | Updated: February 26, 2017 00:47 IST

जालना : आरटीई अंतर्गत शाळेत प्रवेश घेण्यासाठी शिक्षण विभागाने विद्यार्थ्याच्या घरापासून शाळेचे अंतर किती आहे याचा पुरावा सादर करावा लागणार आहे.

जालना : आरटीई अंतर्गत शाळेत प्रवेश घेण्यासाठी शिक्षण विभागाने विद्यार्थ्याच्या घरापासून शाळेचे अंतर किती आहे याचा पुरावा सादर करावा लागणार आहे. यामुळे खोटी माहिती देऊन प्रवेश मिळविणाच्या प्रकारास चाप बसणार आहे. यंदाच्या प्रवेश प्रक्रियेपासून हा निर्णय लागू करण्यात आला आहे. शिक्षण हक्क २००९ कलम १२ (१) सी नुसार आर्थिक दुर्बल घटक आणि मागास बालकांना अनुदानीत, विनाअनुदानीत आणि स्वयंअल्पसहाय शाळांमध्ये मोफत शिक्षण मिळावे यासाठी हा कायदा लागू करण्यात आला. या अंतर्गत जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून २१६ शाळांमध्ये २५ टक्के जागांवर आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येत आहेत. ही संपूर्ण प्रक्रिया आॅनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. परंतु जिल्ह्यात राबविण्यात येत असलेली ही प्रक्रिया तांत्रिक बिघाड, आणि शाळांची उदासिनता आदी कारणांनी नेहमीच चर्चेचा विषय ठरत आहे. तर दुसरीकडे काही पालक खोटी कागदपत्रे सादर करून आपल्या परिसरतील शाळेत प्रवेश मिळवित असल्याचे शिक्षण विभागाच्या निदर्शनास आले. त्यामुळे आत्ता नव्या नियमानुसार प्रवेश घेण्यासाठी घरापासून एक किलोमीटर परिसरातील शाळा प्रवेशासाठी निवडावी किंवा जागा पूर्ण भरल्या असेल तर तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या शाळेची निवड करावी असा निकष आहे. परंतु पालक विशिष्ट शाळेतच आपल्या पाल्यांना प्रवेश मिळावा यासाठी त्या परिसरात राहत असल्याची खोटी कागदपत्रे सादर करतात. स्वत:चे घर असून, सुध्दा भाडेतत्वावर राहत असल्याचे दाखवून प्रवेश घेत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. परिणामी गरीब विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहत असल्याचे शासनाच्या निर्दशनास आल्याने हा निर्णय घ्यावा लागला. जर विद्यार्थ्यांच्या पालकांचे घर भाडेतत्वावर असेल तर त्यासाठी प्रवेशाच्या वेळी पुरावा म्हणून दुय्यम निबंधक यांची राजिस्ट्री केलेली भाडेपट्टी लागणार आहे. तसेच पालकांचे उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त असूनही उत्पन्न कमी दाखवून प्रवेश मिळवित असल्याने जिल्ह्यात यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत घर आणि शाळेचा अंतराचा पुरावा आॅनलाईन सादर करणे अनिवार्य करण्यात आला आहे. शासनाच्या या निर्णयामुळे गैरप्रकारास काही प्रमाणात का होईना अळा बसेल. पालक पुरावा देणार असलयाने प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता येण्याची शक्यता आहे. प्रवेशाची २५ फेब्रुवारी ही अंतिम तारीख होती. ही तारीख २ मार्च पर्यत शिक्षण संचालक गोविंद नांदेडे यांनी मुदत वाढ दिल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.परंतु एकीकडे शासन दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्यावर भर देत आहे. परंतु विद्यार्थ्यांचे शुल्क मात्र शासनाकडून वारंवार शाळाकडून मागणी करूनही दोन दोन वर्षे मिळत नसल्याने अनेक शाळा यातून पळ काढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शासनाचा चांगला निर्णय जिल्ह्यात यशस्वी होणार का याकडे लक्ष आहे. (प्रतिनिधी)