बीड : शहरातील विविध भागात आजही मोठ्या प्रमाणात धोकादायक इमारती उभ्या आहेत. यासंबंधी दोन महिन्यापूर्वी पालिकेकडून सर्व्हे सुद्ध करण्यात आला होता, मात्र हा सर्व्हे अपेक्षेप्रमाणे झाला नसल्याने हा सर्व्हे पुन्हा करण्यात यावा, असे आदेश मुख्याधिकाऱ्यांनी संबंधीत विभागाला दिले आहेत.नगर पालिकेच्या वतीने शहरातील धोकादायक इमारतींचा सर्वे करण्यासाठी तीन विभाग करण्यात आले होते. सुभाष रोड, शिवाजी नगर व पेठ बीड या तीन भागात प्रत्येकी एका स्वच्छता निरीक्षकाला सर्वे करण्याचे आदेश तत्कालीन मुख्याधिकारी व्ही.बी.निलावाड यांनी पावसाळा सुरू होण्यापूर्वीच दिले होते. मात्र स्वच्छता निरीक्षकांनी हे सर्व्हे केले खरे, मात्र त्यामध्ये आढळून आलेल्या धोकादायक इमारतींवर कसलीही कारवाई करण्यात आली नव्हती. निलावाड यांच्या कार्यकालात पाठविण्यात आलेल्या नोटीसा केवळ नावालाच ठरल्या. त्यामुळे आजही शहरातील पेठबीड भागात १५ ते २० धोकादायक इमारती उभ्या आहेत.या धोकादायक इमारतींपासून नागरीकांना कधीही धोका निर्माण होऊ शकतो, त्यादृष्टीने नवीन मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालसिंघन यांनी संबंधित विभागाला पुन्हा सर्व्हेे करून अहवाल सादर करण्याचे आदेश सोमवारी दिले आहेत. (प्रतिनिधी)
धोकादायक इमारतींचा फेर सर्व्हे
By admin | Updated: September 23, 2014 23:42 IST