शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

योजनेतील रुग्णालयांच्या संख्येत झपाट्याने वाढ; रुग्णांवर उपचारासाठी ‘शर्यत’

By संतोष हिरेमठ | Updated: August 25, 2025 20:20 IST

दोन वर्षांत ७० हजार रुग्णांवर ४३२ कोटींचे उपचार

छत्रपती संभाजीनगर : एक काळ होता की, योजनेंतर्गत उपचार करण्यात खासगी रुग्णालये फारशी रुची दाखवत नसत. मात्र, आता योजनेेंतर्गत उपचार करणाऱ्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. एकत्रित आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत उपचार करणाऱ्या रुग्णालयांची संख्या दीड वर्षात दुपटीने वाढली आहे. ही संख्या आणखी वाढणार आहे. या योजनेत गेल्या दोन वर्षांत सुमारे ७० हजार रुग्णांवर ४३२ कोटींचे उपचार करण्यात आले.

योजनेत मोफत उपचार होत असल्याने गरीब व गरजू रुग्णांना मोठ्या प्रमाणावर मदत होत असून, कोट्यवधी रुपयांचे उपचार मोफत योजनेतून केले जात आहेत. हृदयविकार, कर्करोग, मूत्रपिंड विकारांसह १ हजार ३५६ प्रकारचे उपचार, शस्त्रक्रिया योजनेंतर्गत उपलब्ध आहेत. जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांसोबत अनेक खासगी रुग्णालयेही या योजनेत सामील झाली आहेत.

अशी वाढली योजनेतील रुग्णालये- जानेवारी २०२४ मध्ये योजनेत उपचार करणारी ३८ रुग्णालये होती.- मार्च २०२५ मध्ये रुग्णालयांची ही संख्या वाढून ६५ वर आली.- ऑगस्ट २०२५ मध्ये आता एकूण ८२ रुग्णालये योजनेंतर्गत उपचार करत आहेत.

१८२ रुग्णालयांचे लक्ष्यजिल्ह्यात ५०९ खासगी रुग्णालये आहेत. यातील किमान १८२ रुग्णालये योजनेची अंगीकृत रुग्णालये करण्याचे लक्ष्य आरोग्य यंत्रणेने ठेवले आहे.

योजनेत उपचाराची स्थिती: १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ - ३१ हजार ६६० रुग्णांनी ६६ हजार ७५५ शस्त्रक्रिया व विविध उपचारांचा लाभ घेतला.- यासाठी १९२ कोटी ६ लाख ४८ हजार १८१ रुपयांची मंजुरी देण्यात आली.

१ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ - ३९ हजार २९६ रुग्णांनी ८० हजार ३०० शस्त्रक्रिया व विविध उपचारांचा लाभ घेतला.- यासाठी २४० कोटी ८३ लाख ७२ हजार ६१७ रुपयांची मंजुरी देण्यात आली.

अर्ज आल्यानंतर रुग्णालयांची पाहणीएकत्रित आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेचे अंगीकृत रुग्णालय होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार अर्ज येणाऱ्या रुग्णालयांची जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व अधिकाऱ्यांकडून पाहणी करून पुढील प्रक्रिया केली जाते. सरकारी रुग्णालयांमध्ये योजनेतील अंगीकृत रुग्णालयांची यादी लावण्यावर भर दिला जात आहे.- डाॅ. दयानंद मोतीपवळे, सहायक संचालक (वैद्यकीय), आरोग्य विभाग

टॅग्स :hospitalहॉस्पिटलchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर